नवी दिल्ली 13 ऑक्टोबर : सोशल मीडियाच्या (Social Media) वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला अनेकदा निरनिराळे व्हि़डिओ व्हायरल (Viral Videos) झाल्याचं पाहायला मिळतं. यातील अनेक व्हिडिओ असे असतात जे हैराण करतात. तर, अनेक व्हिडिओ असे असतात जे खळखळून हसवतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
असं काय झालं की रामलीलेतला 'रावण' सगळं सोडून भांगडा करायला लागला, पाहा VIDEO
व्हिडिओमध्ये एक मांजर कोल्ह्यांसोबत (Viral Video of Cat and Fox) भिडल्याचं पाहायला मिळतं. यानंतर ती त्यांना अशी अद्दल घडवते की पुढच्या वेळी मांजरीसोबत पंगा घेताना कोल्हा नक्कीच विचार करेल. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लोकांची या व्हिडिओला भरपूर पसंतीही मिळत आहे.
एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, मांजर खरंच आक्रमक निघाली. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, याला म्हणतात दरारा. आणखी एकानं कमेंट करत लिहिलं, पुढच्या वेळी कोणाचीही शिकार करण्याआधी हे कोल्हे विचार नक्कीच करतील
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका घराच्या छतावरुन एक मांजर चाललेली असते. इतक्यात एक कोल्हा पुढून तर एक कोल्हा मागून तिच्यावर हल्ला करतो. यानंतर मांजर आक्रमक होते आणि निर्भीडपणे त्यांचा सामना करते. कोल्हेदेखील मांजरीचा राग पाहून घाबरतात आणि तिथून निघून जातात.
लग्नानंतर फळफळलं कपलचं नशीब! हनीमूनऐवजी केलं फक्त एक काम आणि 7 कोटींचे मालक बनले
हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत व्हिडिओ हजारो व्ह्यूज आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.