मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! दिवसाढवळ्या रुग्णालयात दिसलं भयावह दृश्य; पाहूनच महिलेला फुटला घाम

बापरे! दिवसाढवळ्या रुग्णालयात दिसलं भयावह दृश्य; पाहूनच महिलेला फुटला घाम

वारंवार पुसूनही कोणीतरी ओल्या फरशीवर पाय उमटवत असल्याचं पाहून तिला धक्का बसला. विशेष बाब म्हणजे ती स्वतः तिथे उपस्थित असूनही यावर नेमकं कोण चालत आहे, हे तिला दिसलं नाही.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 ऑक्टोबर : फरशी पुसल्यानंतर कोणी यावरुन चाललं तर त्याच्या पायाचे ठसे यावर अगदी सहज उमटतात. या गोष्टीसाठी अनेकांनी घरातील व्यक्तींच्या रागाचाही सामना केला असेल. मात्र, हेच पायाचे छाप एखादं भूत उमटवत असेल तर? भूताला कोण ओरडणार. ब्रिटनमधील एक स्वच्छता कर्मचाऱी असलेल्या महिलेसोबतही असंच काहीसं घडलं. ही महिला जेव्हा फरशी पुसत होती, तेव्हा तिला फरशीवर अजब पायाचे ठसे दिसत होते (Mysterious Footprints in Hospital). वारंवार पुसूनही हे ठसे पुन्हा पुन्हा दिसत होते.

रात्रीच्या वेळी भूत बनून लोकांना घाबरवायला गेलेली तरुणी; गमवावा लागला जीव

अॅड्रियाना नावाची महिला ब्रिटनच्या एका रुग्णालयात हाउसकिपिंग डिपार्टमेंटमध्ये (Housekeeping Department of Hospital) काम करते. नेहमीप्रमाणे सकाळी सकाळीच ती फरशी पुसण्याचं काम करत होती. मात्र, वारंवार पुसूनही कोणीतरी ओल्या फरशीवर पाय उमटवत असल्याचं पाहून तिला धक्का बसला. विशेष बाब म्हणजे ती स्वतः तिथे उपस्थित असूनही यावर नेमकं कोण चालत आहे, हे तिला दिसलं नाही.

आपल्यासोबत घडलेल्या या अजब घटनेचा व्हिडिओ महिलेनं TikTok वर शेअर केला आहे. महिलेनं असा दावा केला की तिथे काहीतरी अदृश्य शक्ती होती. जी वारंवार तिनं साफ केलेल्या फरशीवर चालत होती. महिलेनं सांगितलं की रुग्णालयातील रूममधून एक पेशंट डिस्चार्ज होऊन दुसरा तिथे येण्याआधी साफसफाई करावी लागते. फरशी पुसल्यानंतर त्यावर असलेले पायाचे ठसे निघून जातात. मात्र, तरीही वारंवार हे ठसे दिसत असल्यानं ती घाबरली. विशेष बाब म्हणजे इथे एक नव्हते तर तीन पायांचे ठसे होते.

या राजानं 5000 महिलांसोबत ठेवले संबंध; जनताही कंटाळली, अखेर केलं हे काम

हा व्हिडिओ पाहून अनेक सोशल मीडिया यूजर्सनी आपले अनुभवही शेअऱ केले. काही लोकांनी हे पाहून म्हटलं की रुग्णालयात आत्मा होता. एका व्यक्तीनं यावर कमेंट करत सांगितलं, की तोदेखील रुग्णालयात काम करतो. तेथील एक वॉशरूमचा वापर करण्यास मनाई आहे. कारण त्यात भूत असल्याचं म्हटलं जातं. तरी काहींनी कमेंट करत म्हटलं, की कदाचित रुग्णाच्या पायाला तेल लागलेलं असले. हे पुसल्यानंतरही जात नाही. यावर रिप्लाय करत महिलेनं सांगितलं, की फरशी पुसण्यासाठी ते अतिशय स्ट्रॉन्ग केमिकलचा वापर करतात. यामुळे कोणताही डाग निघतो.

First published:

Tags: Horror, Viral news