मुंबई, 11 मार्च : सिंह जंगलाचा राजा. फक्त माणसंच नाही तर प्राणीही त्याला पाहून थरथर कापतात. एकदा का कुणी त्याच्या तावडीत सापडलं तरं त्याची सुटका अशक्यच. पण काही प्राणी नशीबाने, ताकदीने किंवा युक्तीने सिंहासारख्या भयानक प्राण्यालाही लढाईत हरवतात. अशाच प्राण्यांपैकी एक म्हणजे सिंह जरी खतरनाक असला तरी गेंडा शरीराने महाकाय प्राणी आहे. हे दोन्ही प्राणी जेव्हा आमनेसामने येतील तेव्हा काय होऊ शकतं, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकट्या गेंड्यावर सिंहांच्या कळपाने हल्ला केला आहे. गेंडा आणि सिंहांच्या फायटिंगचा हा जबरदस्त व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. गेंडा एकटा असला तरी सर्व सिंहांना तो पुरून उरला आहे. सिंहांना त्याने अशी अद्दल घडवली आहे की यापुढे त्याची शिकार करताना ते दहावेळा विचार करतील. किंबहुना त्याच्याशी पंगाच घेणार नाहीत. व्हिडीओत पाहू शकता सिंह तलावाजवळ पाणी प्यायला आले. त्याच पाण्यात एक महाकाय गेंडा होता. सिंह तिथं येताच गेंडा हळूच पाण्यातून बाहेर पडतो. तेव्हा सिंह पाणी पिणं सोडून गेंड्याची शिकार करायला धावतात. गेंड्यावर हल्ला करतात. हे वाचा - वाघालाही न घाबरणाऱ्या अस्वलाची छोट्याशा पपीला पाहूनच तंतरली; VIDEOचा शेवट शॉकिंग सुरुवातीला एक सिंह गेंड्याच्या पाठीवर बसून त्याला आपल्या नखांनी आणि दातांनी ओरबडण्यााच प्रयत्न करतो. त्याच्या तावडीतून गेंडा कसाबसा सुटतो. त्यानंतर इतर सिंहही त्या सिंहाच्या मदतीला येतात. एकट्या गेंड्याला सिंह चारही बाजूने घेरून धरतात.
पण गेंडा तो गेंडा. जरी सिंह खतरनाक असले तरी गेंडाही काही कमी नाही. सिंहांना तो आपल्या जवळ बिलकुल येऊ देत नाही. त्यांच्या दिशेने धावत जाऊन त्यांना आपल्यापासून दूर पळवतो. त्यानंतर त्यांच्यापासून स्वतः दूर जातो. हे वाचा - Shocking! हत्तीने म्हशीला सोंडेत धरून जमिनीवर आपटलं; VIDEO चा शेवट धक्कादायक सहजरित्या हा गेंडा आपली शिकार होईल असं सिंहांना सुरुवातीला वाटलं होतं. पण याची शिकार करणं वाटतं तितकं सोपं नाही हे त्यांनाही कळून चुकतं. त्यामुळे ते नंतर त्याच्यापासून दूरच राहतात. lion_kings1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.