मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मुलीवर शार्कनं हल्ला करताच वडील बनले ढाल; समुद्रात उडी घेतली अन्...

मुलीवर शार्कनं हल्ला करताच वडील बनले ढाल; समुद्रात उडी घेतली अन्...

एका 21 वर्षीय तरुणीला शार्कच्या हल्ल्यात (Shark Attack) आपला पाय गमवावा लागला. मात्र, वडिलांच्या धाडसामुळे तिचा जीव वाचला

एका 21 वर्षीय तरुणीला शार्कच्या हल्ल्यात (Shark Attack) आपला पाय गमवावा लागला. मात्र, वडिलांच्या धाडसामुळे तिचा जीव वाचला

एका 21 वर्षीय तरुणीला शार्कच्या हल्ल्यात (Shark Attack) आपला पाय गमवावा लागला. मात्र, वडिलांच्या धाडसामुळे तिचा जीव वाचला

  • Published by:  Kiran Pharate

वॉशिंग्टन 13 जुलै : एका 21 वर्षीय तरुणीला शार्कच्या हल्ल्यात (Shark Attack) आपला पाय गमवावा लागला. मात्र, वडिलांच्या धाडसामुळे तिचा जीव वाचला. शार्कनं जेव्हा तिच्यावर हल्ला केला तेव्हा तिचे वडील तिच्यासाठी ढाल बनून उभा राहिले. त्यांनी बराच वेळ शार्कसोबत लढा दिला आणि या शार्कला हरवून समुद्रात परत पाठवलं. ही घटना अमेरिकेच्या (America) कॅरोलिनामधील आहे.

मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, Paige Winter आपले वडील चार्ली आणि एका खास मित्रासोबत उत्तरी कॅरोलिनामधील एका बिचवर रविवारी फिरण्यासाठी गेली होती. यादरम्यान सर्वांनी समुद्रातील लाटांसोबत खेळण्याचा निर्णय घेतला. काहीवेळ सगळं काही ठीक होतं. मात्र, नंतर अचानक Paige ला असं वाटलं की कोणीतरी तिची पाय ओढत आहे. सुरुवातीला तिला असं वाटलं की आपले वडील मस्करी करत आहेत. मात्र, काहीच वेळात तिला समजलं की शार्कनं तिच्यावर हल्ला केला आहे.

मुंबईतील तरुणी बंगाली बाबाच्या जाळ्यात अडकली; लोकलमधील जाहिरात पाहून फोन केला अन

शार्क Paige Winter हिला पाण्यात ओढत होता. आपल्या मुलीला तडफडताना पाहून चार्ली यांनी समुद्रात जात शार्कसोबत भिडण्यास सुरुवात केली. त्यांनी शार्कच्या चेहऱ्यावर बुक्क्यांनी मारा केला. यानंतर अखेर शार्कनं Paige ला सोडलं आणि तिथून निघून गेला. तोपर्यंत तिच्या पायातून भरपूर रक्त आलं होतं आणि त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती.

चाट विक्रेत्याचे अश्रू पाहून मुंबईकर भावुक; व्हायरल होताच मदतीसाठी आले अनेक हात

Paige हिच्यासोबत ही घटना 2019 मध्ये घडली होती. तिनं नॅशन ज्योग्राफीकच्या शार्कफेस्ट सीरिजमध्ये आपल्या या भयंकर अनुभवाबद्दल सांगितलं. तिनं सांगितलं, की या ट्रीपसाठी ती प्रचंड उत्सुक होती, सर्वकाही व्यवस्थित चाललं होतं. मात्र, शार्कनं माझ्यावर हल्ला केला. वडीलांमुळे आपला जीव वाचल्याचंही तिनं म्हटलं.

First published:

Tags: Shark death, Viral news