मुंबई 13 जुलै : कोरोना (Coronavirus) आणि याकाळात सतत होणारं लॉकडाऊन (Lockdown) यामुळे अनेकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलाही (Mumbai) याचा मोठा फटका बसला आहे. मात्र, या काळात ही गोष्टही सिद्ध झाली आहे, की एखाद्या व्यक्तीची छोटीशी मदत दुसऱ्या व्यक्तीसाठी किती महत्त्वाची ठरते, यात सोशल मीडियाचाही (Social Media) मोठा वाटा आहे. सोशल मीडियानं आणखी एका व्यक्तीचं आयुष्य बदलल्याची घटना आता मुंबईतून समोर आली आहे. VIDEO: महिलेला वाचण्यासाठी युवकाची समुद्रात उडी; गेट वे ऑफ इंडियाजवळचा प्रकार यात मुंबईतील एका वयस्कर व्यक्तीची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. रविवारी अवनी शाह नावाच्या एका तरुणीनं मिठीबाई कॉलेजबाहेर चाट विकणाऱ्या (Chaat Seller Outside Mithibai College) एका वयस्कर व्यक्तीचा फोटो शेअर केला होता आणि त्यांना मदतीची गरज असल्याचं सांगितलं होतं. या तरुणीनं लिहिलं, की ‘मुंबईमध्ये राहिलेल्या व्यक्तींना प्रसिद्ध मिठीबाई कॉलेज डोसा, सँडविच, वडापाव याबाबत माहिती असतेच. मात्र, याच ठिकाणी एक वृद्ध व्यक्ती गरमागरम चाट (Mithibai college chaat) विकतात. त्यांना मी काल रडताना पाहिलं.’
Hey everyone,
— Avni Shah (@Avnishah1008) July 11, 2021
Whoever knows about Mumbai, knows the famous Mithbai college dosas, sandwiches and vada pavs!
But there’s an old man selling chana jor garam chaat at the very same place. Saw him crying yesterday.
(1/3)
Just found his picture via a friend! pic.twitter.com/vEEqqFvSq2
— Avni Shah (@Avnishah1008) July 11, 2021
पुढे या तरुणीनं सांगितलं, की ‘काल शनिवार असूनही या व्यक्तीला दिवसभरात 70 रुपयेही मिळालेले नाहीत. जेव्हा मी त्यांना याबाबत विचारलं तेव्हा शनिवारीही केवळ 70 रुपयांची कमाई करू शकल्याचं त्यांनी सांगितलं.’ याठिकाणी तुम्ही येणार असाल तर कृपया या व्यक्तीकडून चाट नक्की खरेदी करा, असं आवाहन तिनं मुंबईकरांना केलं. तिनं पुढे सांगितलं, की याची चवही अत्यंत उत्कृष्ट असून 40 ते 50 रुपयांत तुम्हाला हे मिळतं. तब्बल 23 वर्षांनंतर मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय काही काळातच शहराच्या कानाकोपऱ्यात ही पोस्ट पोहोचली आणि प्रचंड व्हायरल झाली. मुंबईबाहेरील रहिवाशांनीदेखील या कठीण काळात दोन वेळच्या अन्नासाठी कष्ट करणाऱ्या या व्यक्तीच्या मदतीची इच्छा व्यक्त केली. अनेक NGO नंही या व्यक्तीला जेवण आणि राशन कीट पोहोच केलं. नेटकऱ्यांनी मुंबईत राहणाऱ्या आपल्या मित्रांना या व्यक्तीकडून चाट खरेदी करण्याची विनंती केली आणि एका पोस्टमुळे या वृद्धाच्या डोळ्यातील अश्रू पुसले गेले.