नवी मुंबई, 13 जुलै: प्रियकराला (Boyfriend) वश करण्याच्या नावाखाली (pretext of subduing lover) मुंबईतील एका भोंदूबाबानं (Bhondubaba) युवतीला तब्बल साडेचार लाख रुपयांना गंडा (Fraud) घातला आहे. संबंधित भोंदूबाबानं विविध पूजा, बळी सांगून पीडितेकडून अधिकचे पैसे उकळले आहेत. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित युवतीनं खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी भोंदूबाबाच्या मुसक्या आवळल्या () आहेत. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात जादूटोणा आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
वासिम रइस खान ऊर्फ बाबा कबीर खान बंगाली ऊर्फ बाबा बंगाली असं अटक केलेल्या भोंदूबाबाचं नावं आहे. संबंधित आरोपी सार्वजानिक ठिकाणी दैनंदिन आयुष्यातील अडचणी दूर करण्याचा दावा करणाऱ्या जाहिरातील लावून नागरिकांची फसवणूक करत होता. 24 वर्षीय फिर्यादी तरुणीही बंगाली बाबाची हीच जाहीरात पाहून आरोपीच्या जाळ्यात गुंतली होती.
हेही वाचा-रक्ताचा टिळा लावून केलं प्रेमाचं नाटक; विवाहित तरुणाचे तरुणीवर लैंगिक अत्याचार
खरंतर, फिर्यादी तरुणीचा सहा महिन्यापूर्वी आपल्या प्रियकरासोबत ब्रेक अप झाला होता. दोघांतील संपर्क तुटल्यानं ती अस्वस्थ झाली होती. प्रियकर प्रतिसाद देत नसल्यानं तिला नैराश्य आलं होतं. दरम्यान लोकलमधून प्रवास करताना, फिर्यादी तरुणीनं बंगाली बाबाची जाहिरात वाचून त्याच्याशी संपर्क साधला. आरोपीनं प्रियकराला वश करण्याचा बहाणा बनवत फिर्यादी तरुणीकडून वेळोवेळी 4 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक केली. विशेष म्हणजे फिर्यादी तरुणी उच्चशिक्षित असून ती बंगाली बाबाच्या जाळ्यात अडकली होती.
हेही वाचा-योगी बाबाचा हायप्रोफाइल फ्रॉड, ज्वेलर्सच्या पत्नीला घालत होता असा गंडा
आपली आर्थिक फसवणूक होतं असल्याचं लक्षात येताच, फिर्यादीनं भोंदूबाबाकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला. पण आरोपीनं पैसे द्यायला नकार देत, काळी जादू करून अपघात घडवून आणण्याची धमकी दिली. यानंतर पीडितेनं खारघर पोलीस ठाण्यात जावून आरोपी बंगाली बाबाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी काल रात्री उशीरा सापळा रचून भोंदूबाबा वसिम रईस खान ऊर्फ बाबा कबीर खान बंगाली यास अटक केली आहे. आरोपीनं अशाच प्रकारे शहारीतील अनेका फसवलं असल्याची शंका पोलिसांना आहे. त्यामुळे संबंधित आरोपीकडून फसवणूक झाली असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Financial fraud, Mumbai