हैदराबाद, 25 नोव्हेंबर : पालकांचा जीव त्यांच्या मुलात अडकलेला असतो. आपल्या हातानेच आपल्या मुलांचं काही बरंवाईट होणं यापेक्षा पालकांसाठी दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणतीच नाही. अशीच धक्कादायक घटना घडली ती हैदराबादमध्ये. एका बापाने नकळतपणे आपल्या लेकाच्या अंगावर कार चढवली (Father accidentally crushed son by car) गाडीखाली चिरडल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे (Son died by fathers car).
हैदराबादच्या एलबी नगरमधील ही घटना आहे (Hyderabad accident video) अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हृदय पिळवटून टाकणारा असा हा व्हिडीओ आहे (Shocking video) .
Tragic accident in Hyderabad's LB Nagar. Child killed after car driven by father accidentally runs him over. TW, visuals can be distressing. pic.twitter.com/Y4VAJMmlPY
— Aditi (@SpaceAuditi) November 23, 2021
@SpaceAuditi ट्विटर युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर एक कार उभी आहे. एक व्यक्ती त्या कारच्या दिशेने जाते. ती व्यक्ती कारमध्ये जाऊन बसते. त्याच्यामागो माग एक मुलगाही जातो. तोसुद्धा कारमध्ये बसतो. थोड्या वेळाने आणखी एक लहान मुलगा तिथं दिसून येतो. तोसुद्धा कारकडे धावत जातो. कारच्या आजूबाजूला खेळू लागतो.
हे वाचा - VIDEO- तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी त्याने छतावरून मारली उडी; भारी पडली हिरोगिरी
वडील आता गाडीत असल्याने त्यांचा लेक गाडीजवळ आहे, याची त्यांना कल्पनाच नाही. मुलगा आधी गाडीच्या मागे जातो आणि थोड्या वेळाने पुढे येतो. त्याचवेळी त्याचे वडील गाडी सुरू करतात. चिमुकला रस्त्यावर पडतो आणि गाडी त्याच्यावरून जाते. ज्यावेळी गाडी चिमुकल्याच्या अंगावरून जाते तेव्हा मुलगा गाडीच्या मधोमध होता. त्याची तशी वाचण्याची शक्यता होती. पण थोडं पुढे गेल्यानंतर गाडी थोडी क्रॉस होऊनरिव्हर्सही येते आणि त्याचवेळी कदाचित मुलाच्या अंगावरून चाक गेलं असावं.
हे वाचा - होमवर्क न केल्याबद्दल पित्याने दिली राक्षसी शिक्षा, आईने रेकॉर्ड केला VIDEO
गाडीखाली आपला मुलगा आला आहे, हे समजताच वडीलांना धक्का बसतो. ते धडपडत गाडीतून बाहेर पडतात. आपल्या चिमुकल्याला उचलून घराच्या दिशेने धावतात. मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आला. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Parents and child, Viral, Viral videos