मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अमानुष! होमवर्क न केल्याबद्दल पित्याने दिली राक्षसी शिक्षा, आईने रेकॉर्ड केला VIDEO

अमानुष! होमवर्क न केल्याबद्दल पित्याने दिली राक्षसी शिक्षा, आईने रेकॉर्ड केला VIDEO

मुलाने होमवर्क न केल्याची (Terrible punishment to son for doing homework by his father) शिक्षा म्हणून त्याच्या वडिलांनी उलटं टांगून जीवघेणी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

जयपूर, 24 नोव्हेंबर: मुलाने होमवर्क न केल्याची (Terrible punishment to son for doing homework by his father) शिक्षा म्हणून त्याच्या वडिलांनी उलटं टांगून जीवघेणी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळापासून जगभरातील शाळा (Student’s homework) बंद आहेत आणि मुलं घरात आहेत. शाळेचं वातावरण नसल्यामुळे मुलं अभ्यासात टाळाटाळ करताना दिसतात. आता पुन्हा शाळा सुरु झाल्या असल्या तरी अनेक मुलांची अभ्यासाची सवय मोडल्याचं चित्र आहे. मात्र आपला मुलगा अभ्यास करत नाही, याचा संताप आल्याने त्याच्या वडिलांनी त्याला दिलेली (Inhuman punishment to child) अमानवी शिक्षा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मुलाला अमानूष मारहाण

राजस्थानच्या वैकुंठपूर भागात अभ्यास करत नसल्याच्या रागातून वडिलांनी मुलाला दोरीला बांधून उलटं लटकवल्याचं या व्हिडिओतून समोर आलं आहे. मुलावर रागावलेल्या वडिलांसोबत आईनंदेखील त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुलाला बांधण्यात आईनेदेखील मदत केली. त्यानंतर तिने तिचा मोबाईल खिडकीत ठेवला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं. त्यानंतर वडिलांनी काठी काठून मुलाला झोडपायला सुरुवात केली. त्यावेळी मात्र आईला मुलाची दया आली आणि वडिलांपासून तिनं मुलाचा बचाव केला. या मारहाणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग तिने स्वतःच्या भावाला पाठवलं.

हे वाचा - बंदुकीच्या धाकाने कापूस व्यापाऱ्याला लुटलं; डोळ्यादेखत लाखो रुपयांवर मारला डल्ला

मामाने केली सुटका

मुलाच्या मामाने चाईल्ड लाईनला हा व्हिडिओ पाठवून मुलाच्या वडिलांविरोधात तक्रार नोंदवली. घरी येऊन तो मुलांना आजोळी घेऊन गेला. हा व्हिडिओ राजपुरा गावातील असल्याची खातरजमा पोलिसांनी सुरू केली असून बालहक्क कायद्यानुसार कारवाईला सुरुवात केली आहे. आरोपी वडिलांना हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली असून आई, वडील आणि मुलाची बाजू ऐकून घेतल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून तो कुणीही एकमेकांना फॉरवर्ड करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. मुलांच्या मारहाणीचं समर्थन करणारा हा व्हिडिओ पालकांनी इतरांना पाठवू नये आणि कुठल्याही परिस्थितीत लहान मुलांवर हात उगारू नये, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.

First published:

Tags: Crime, Father, Son, Viral video.