मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Stunt Video- तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी छतावरून मारली उडी पण...; तरुणाला महागात पडली हिरोगिरी

Stunt Video- तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी छतावरून मारली उडी पण...; तरुणाला महागात पडली हिरोगिरी

छतावरून उडी मारणाऱ्या तरुणाची झाली भयंकर अवस्था.

छतावरून उडी मारणाऱ्या तरुणाची झाली भयंकर अवस्था.

छतावरून उडी मारणाऱ्या तरुणाची झाली भयंकर अवस्था.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 25 नोव्हेंबर : तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी तरुण काय काय नाही करत. तरुणी शक्यतो स्मार्ट, बॉडी बिल्डर तरुणांकडे आकर्षित होतात त्यामुळे तरुण आपली ताकद दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. असा प्रयत्न एका तरुणाने केला. मुलींना पाहून त्यांच्यासमोर त्याने छतावरून उडी मारली (Boy jumping from roof). पण त्याची ही हिरोगिरी त्याला चांगलीत महागात पडली (Stunt video).

तरुणाच्या हिरोपंतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. हा तरुण मुलींसमोर स्टाइल मारायला गेला. पण दुसऱ्याच क्षणी त्याची हिरोगिरी बाहेर पडली. त्याची अवस्था भयंकर झाली. तरुणी इम्प्रेस झाल्या की नाही माहिती नाही, पण त्याची अशी अवस्था पाहून त्यांना धक्का मात्र नक्कीच बसला असेल.

व्हिडीओत पाहू शकता. एक मुलगा आपल्या काही मित्र-मैत्रिणींसोबत घराच्या छतावर बसला होता. काही वेळात तो धावत छताच्या कोपऱ्यावर येतो आणि कोलांटी घेत छतावरून खाली उडी मारतो. हवेत तो गोलगोल फिरतो आणि धाडकन जमिनीवर आपटतो. त्याचा स्टंट त्याला चांगलाचा भारी पडला.

हे वाचा - हाय हिल्स आणि लाँग स्कर्ट घालून तरुणीचं जबरदस्त बॅक फ्लिप; अनोखा VIDEO एकदा बघाच

या स्टंटच्याच व्हिडीओत तुम्ही पुढे पाहू शकता की तो थेट रुग्णालयात दिसतो.  त्याच्या हाताला दुखापत झाली आहे, हात फ्रॅक्चर झाला आहे. सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही आहे.  हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही युझर्स तरुणाची अवस्था पाहून हैराण झाले आहेत. त्यांनी तरुणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर काहींना तरुणींसमोर स्टंट मारणाऱ्या या तरुणाची खिल्ली उडवत मजेशीर कमेंट केल्या आहेत.

हे वाचा - किक मारून भिंत तोडली पण..., दुसऱ्याच क्षणी तरुणाची हिरोगिरी उतरली; पाहा VIDEO

@_____solemon_____• या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हीसुद्धा हा व्हिडीओ पाहिला आहे. त्यामुळे तुम्ही तरी आता सावध व्हा. जीवासाठी घातक ठरतील असे स्टंट करू नका, इतकंच तुम्हाला आवाहन.

First published:

Tags: Stunt video, Viral, Viral videos