मुंबई 11 सप्टेंबर : डान्स करायला कोणाला आवडत नाही? लहानांपासून अगदी म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळेच लोक डान्स करण्यासाठी अती उत्साही असतात. म्हणून तर हल्ली प्रत्येक कार्यक्रम डान्स शिवाय अपूर्णच आहे. लोक या कार्यक्रमात डान्स करुन मनसोक्त आनंद लूटतात. आपल्या समोर सोशल मीडियावर असेच अनेक डान्सशी संबंधीत व्हिडीओ येतात. हे व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात. सध्या एका लग्नातील डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण या व्हिडीओ एक आजोबा चक्कं आपलं वय विसरुन मनसोक्त नाचण्याचा आनंद घेत आहेत, शिवाय या म्हाताऱ्या काकांच्या जोडीला एक सुंदर महिला ही अप्रतिम डान्स करत आहे. आपल्या सर्वांना तर हे माहित आहे की लग्न हा खूप आनंदाचा काळ असतो. कारण जी मजा लग्नात होऊ शकतो ती इतर कोणत्याही कार्यक्रमात येत नाही. लग्नाच्या पहिल्या महिन्यापासून वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. मग तो जागरण गोंधळ असो की मेहंदीचा कार्यक्रम किंवा हळदी. अगदी यासाठी संगीतचाही कार्यक्रम ठेवला जातो. हे वाचा : Zoo मधून पळालेला चिंपांझीचे नखरेच भारी, अनेक विनंत्या करुन देखील परतायला तयार नाही, अखेर… पाहा Video अशाच एका लग्नातील डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक म्हातारे काका आणि एक तरुण महिला डान्स करत आहेत.या दोघांच्या अनोख्या डान्स स्टेप्समुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लहान मुलांपासून ते पौढांपर्यंत लोक आहेत, यांपैकी काही लोक उभे आहेत, तर काही बसून गाणं गात आहेत, तसेच काही लोक ढोलकी देखील वाजवत आहेत. या लोकांच्या गाण्यावर एक सुंदर महिला डान्स करत आहेत, तर तिला एक म्हातारे काका साथ देत आहेत.
इतक्या वयात हे म्हातारे काका एखाद्या तरुणा प्रमाणे ठुमके लावत आहेत, तर त्याला ही महिला देखील चांगली साथ देत आहे आणि याच कारणामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला. हे वाचा : VIDEO: एकदा रेल्वे कर्मचाऱ्याने वाचवले प्राण; बाटली घेण्यासाठी पुन्हा रुळाजवळ गेली महिला, हायस्पीड ट्रेन आली अन्… हा व्हिडीओ Dev Bhajan नावाच्या व्यक्तीने युट्यूबवरती शेअर केला गेला आहे, जो जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यावर लोकांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत.