Home /News /viral /

शेजारच्या खोलीतून येत होते विचित्र आवाज; दरवाजा उघडताच ते दृश्य पाहून कुटुंबाला बसला धक्का

शेजारच्या खोलीतून येत होते विचित्र आवाज; दरवाजा उघडताच ते दृश्य पाहून कुटुंबाला बसला धक्का

रेड्डी फॅमिली (Reddy Family) आरामात आपल्या घरात बसलेली होती. याचदरम्यान त्यांना काही विचित्र आवाज ऐकू येऊ लागले.

    नवी दिल्ली 11 ऑक्टोबर : घराच्या एखाद्या कोपऱ्यातून काही विचित्र आवाज (Weird Noise) येऊ लागताच घरातील सगळे लोक तिथे नेमकं काय आहे, हे पाहण्यासाठी उत्सुक होतात. आपल्याशिवाय घरात आणखी असं कोण उपस्थित आहे, असा सवाल त्यांना पडतो. कॅनडाच्या फोर्ट मॅकमरेमध्येही ( Fort McMurray) एका कुटुंबासोबत असंच घडलं. त्यांना भनकही लागली नाही आणि त्यांच्या घराच्या कोपऱ्यात एक भीतीदायक अस्वल (Giant Bear) पोहोचलं. महाभयंकर सापासह 2 वर्षाच्या चिमुरड्याचा खेळ, शेपटी पकडून नेलं ओढत... पाहा PHOTO रेड्डी फॅमिली (Reddy Family) आरामात आपल्या घरात बसलेली होती. याचदरम्यान त्यांना काही विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. मात्र, त्यांना तेव्हाही या गोष्टीची कल्पना आली नाही की त्यांच्या घरात एक मोठं अस्वल आहे. हे मोठं अस्वल घराच्या दरवाज्यांवर नखाने ओरखडू लागलं. हा आवाज ऐकून कुटुंबीय तिथे पोहोचले असता, हे दृश्य पाहून ते पुरते हादरले. CBC Edmonton’s Radio Active सोबत बातचीत करताना कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं, की घरातील सर्वात लहान मुलानं आधी हा आवाज ऐकला. या लहान बाळानं येऊन आपल्या पालकांना विचारलं की तुम्ही काय करत आहात? पूर्ण घरात स्क्रॅच का केले आहेत. आई-वडिलांना काही समजण्याआधीच मोठ्या मुलानं सांगितलं की घराच्या हॉलमध्ये काहीतरी आहे. सर्वांनी हॉलमध्ये जाऊन पाहिलं असता त्यांना दिसलं की एक मोठं काळ्या रंगाचं अस्वल तिथे उभा आहे. आसपास असणाऱ्या सर्व वस्तू त्यानं फोडल्या होत्या आणि संपूर्ण घरात हे अस्वल फिरत होतं. DNA टेस्ट करून आपल्या पूर्वजांचा शोध घेत होती तरुणी; Result समोर येताच हादरली रेड्डी फॅमिलीनं शेजाऱ्यांची मदत घेत हॉलमध्ये सगळीकडे बॅरिकेड्स लावले आणि अस्वलानं बाहेर निघावं यासाठी दरवाजा उघडा ठेवला. नंतर समजलं की हे अस्वल घराची खिडकी तोडून आत आलं होतं. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर या अस्वलाला बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, ते आसपासच्या परिसरातच फिरत राहिलं. कारण या संपूर्ण परिसरातच अस्वले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Viral news, Wild animal

    पुढील बातम्या