मॅट राईट (Matt Wright) नावाची व्यक्ती या चिमुरड्याचे वडील आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये क्रॉक रँगलर म्हणून प्रसिद्ध (Australia's Croc Wrangler) आहे. बोंजो नावाचा हा लहान मुलगा ज्या प्रकारे सापाला शेपटीने पकडून ओढत आहे हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे, मात्र त्याच्या वडिलांना आपल्या मुलाच्या साहसाचं कौतुक वाटतंय
मॅट राईट यांनी स्वतः मगरी पकडण्यात प्रभुत्व मिळवले आहे आणि ते 20 वर्षांपासून नॉर्दर्न टेरिटरीमध्ये हेच काम करत आहे. ते त्यांच्या 2 वर्षांचा मुलगा बोंजो याला प्राण्यांशी निर्भयपणे वागण्याचे प्रशिक्षण देत आहे. हे बाळ बागेत खेळताना 2 मीटर लांब सापाची शेपटी खेचत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील