मराठी बातम्या /बातम्या /Viral /पत्नीच्या माहेरकडच्यांनी बेशुद्ध जावयाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला ग्लास, 15 दिवसांनी घडलं भयानक

पत्नीच्या माहेरकडच्यांनी बेशुद्ध जावयाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला ग्लास, 15 दिवसांनी घडलं भयानक

(प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

(प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता. इथे काहीतरी कारणावरुन त्याचं आपल्या मेहुण्यासोबत आणि इतर लोकांसोबत भांडण झालं आणि त्यांनी त्याला बेदम मारहाण केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

पाटणा 21 जानेवारी : बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका व्यक्तीला पत्नीच्या माहेरी जाणं महागात पडलं. पत्नीला भेटायला तो पोहोचला होता पण सासरच्यांशी भांडण झालं. सासरच्यांनी आधी त्याला बेदम मारहाण केली आणि यातूनही त्यांचं समाधान न झाल्याने त्यांनी बेशुद्ध झालेल्या तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ग्लास टाकला. बेशुद्ध असल्यामुळे आपल्यासोबत नेमकं काय केलं गेलं आहे, हे या व्यक्तीला समजलंच नाही. मात्र पोटात दुखत असल्याने नंतर जेव्हा तो डॉक्टरांकडे गेला तेव्हा समजलं की त्याच्या पोटामध्ये ग्लास आहे.

प्रियकराने लग्नाला दिला नकार, प्रेयसीने उचचलं मोठं पाऊल, तब्बल 96 तास केलं 'हे' काम

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती साहेबगंजच्या रामपूर असली गावातील रहिवासी आहे. ही घटना त्याच्यासोबत 15 दिवसाआधी घडली होती. तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता. इथे काहीतरी कारणावरुन त्याचं आपल्या मेहुण्यासोबत आणि इतर लोकांसोबत भांडण झालं आणि त्यांनी त्याला बेदम मारहाण केली.

युवक बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पूर्ण ग्लास टाकण्यात आला. शुद्धीवर आल्यावर हा व्यक्ती आपल्या गावी परत आला होता. गुरुवारी पोटात दुखत असल्याने तो एसकेएमसीएच गेला होता. यानंतर एक्सरेमधून हा खुलासा झाला. पीडित युवकाने सांगितलं की त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सतत दुखत होतं. मात्र हे किरकोळ असल्याचं समजून तो गावातीलच एका डॉक्टरकडे उपचार घेत होता. इंजेक्शन घेतल्यावर त्याच्या वेदना कमी होत असे.

24 वर्षे एकाच ताटात जेवली, झाला मृत्यू; आईच्या निधनानंतर डॉक्टर लेकाला समजलं मोठं सत्य

यानंतर जेव्हा तो एसकेएमसीएचमध्ये गेला तेव्हा संपूर्ण प्रकरण समोर आलं. शुक्रवारी सकाळी युवकाची तब्येत बिघडल्याने त्याला एसकेएमसीएच येथून पाटणाला रेफर करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की युवकाच्या प्रायव्हेट पार्टमधून त्याच्या पोटामध्ये एक ग्लास टाकण्यात आला होता. ऑपरेशन करून हा ग्लास काढण्यात आला आहे.

First published:

Tags: PRIVATE part, Shocking news