मराठी बातम्या /बातम्या /Viral /प्रियकराने लग्नाला दिला नकार, प्रेयसीने उचचलं मोठं पाऊल, तब्बल 96 तास केलं 'हे' काम

प्रियकराने लग्नाला दिला नकार, प्रेयसीने उचचलं मोठं पाऊल, तब्बल 96 तास केलं 'हे' काम

प्रेमप्रकरण

प्रेमप्रकरण

प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि खास गोष्ट असल्याचं म्हटलं जातं. आत्तापर्यंत आपण प्रेमाची अनेक उदाहरणे पाहिली आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 21 जानेवारी : प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि खास गोष्ट असल्याचं म्हटलं जातं. आत्तापर्यंत आपण प्रेमाची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. लोक एकमेकांच्या जीवापाड प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात. मात्र हे प्रेम मिळालं नाहीतर अनेकजण प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाताना पहायला मिळतात. अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. एका प्रेयसीने प्रेम मिळवण्यासाठी काय पाऊल उचललं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

झारखंडच्या धनबादमध्ये प्रेयसी प्रियकराच्या घरासमोर लग्नाची मागणी करत रात्रंदिवस आंदोलन करताना पहायला मिळाली. 96 तासांहून अधिक काळ लोटला असून या थरथरत्या थंडीत मुलगी बसली आहे. प्रेयसी घरासमोरच बसल्यानंतर बसल्यानंतर प्रियकर फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. आजूबाजूचे लोक मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र मुलगी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम आहे.

हेही वाचा - Madhuri Dixit आहे की दुसरी कोणी? डॉक्टर नेनेही होतील कन्फ्युज, पाहा Video

प्रियकराने आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिला, त्यानंतर मुलीने त्याच्या घरासमोर बसत ती लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं. लग्नासाठी नकार देणं प्रियकराला इतकं महागात पडू शकतं हे त्याला माहित नव्हतं. प्रेयसी प्रियकराच्या घरासमोर बेमुदत संपावर बसली असून प्रियकराशी लग्न करण्याची तिची एकच मागणी आहे. मुलीसोबत तिची वृद्ध आजी आणि वडीलही आपल्या मुलीसह बसले आहेत.

धनबाद जिल्ह्यातील राजगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या उत्तम महतो या प्रेमीयुगुलाच्या घरासमोर धरजोरी येथील एक तरुणी रात्रंदिवस थंडीमध्ये बसली आहे. रात्रीच्या थंडीमुळे लोकांना घराबाहेर पडावेसे वाटत नाही, तिथे रात्रीही तरुणी विरोध करत आहेत. ही बाब स्थानिक मुख्याध्यापकाला समजल्यावर त्यांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलगी आपल्या निर्णयावर ठाम आहे. तरुणीचे म्हणणे आहे की, एसएसएलएनटी कॉलेजमध्ये शिकत असताना दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले. जवळपास 4 वर्षे प्रेमसंबंध होते आणि दोघांच्या घरातील लोकांना याची माहिती आहे. आधी त्याने लग्नाला होकार दिला होता, आता तो मागे फिरला आहे. जोपर्यंत प्रियकर लग्नासाठी तयार होत नाही तोपर्यंत ती त्याच्या घरासमोर बसून राहणार आहे.

First published:

Tags: Love, Top trending, Viral, Viral news