नवी दिल्ली, 1 ऑगस्ट: स्वमालकीचं आलिशान घर (Luxurious house) असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अशा घराच्या खरेदीसाठी लोक बचत करून पैसे साठवतात किंवा कर्ज घेतात. मात्र काही वेळा हे स्वप्न सत्यात येतं पण वास्तविक स्थिती वेगळीच असते. मोठी किंमत देऊनही घरामध्ये राहण्याचं समाधान मिळण्याऐवजी पश्चाताप वाट्याला येतो. अमेरिकेतल्या (America) एका महिलेची घरखरेदीची कहाणी अशीच काहीशी आहे. या महिलेनं तीन कोटी रुपयांना आलिशान घर खरेदी केलं पण ज्यावेळी त्या घरात राहण्याची वेळ आली तेव्हा आपली फसवणूक (Fraud) झाल्याचं तिच्या लक्षात आलं. या घराची रचना सदोष असल्यानं महिलेला पश्चाताप सहन करावा लागला. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे. 28 वर्षांची एमिली आणि 30 वर्षांचा तिचा पती जेफ्री चॉंक यांनी मागच्या महिन्यात अमेरिकेतल्या अर्कान्सास (Arkansas) येथे सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून एक आलिशान घर खरेदी केलं. या स्वप्नातल्या घरासाठी एमिलीनं जीवनभराची पुंजी खर्च केली. पण जेव्हा या घरामध्ये राहण्याची वेळ आली तेव्हा घरातील काही गोष्टी पाहून तिला धक्का बसला. घरातली सदोष रचना पाहून या दाम्पत्याने कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधला. `घराच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च येईल,` असं त्यानं सांगितलं. त्यामुळे अशा सदोष घरात शिफ्ट होण्याशिवाय या दाम्पत्याकडे अन्य कोणताही पर्याय नव्हता. हेही वाचा - जगातील रहस्यमयी गाव, जिथे जन्म घेताच जाते दृष्टी; माणूसच नाही तर प्राणी देखील पाहू शकत नाही जग वास्तविक एमिली आणि तिचा पती जेफ्री नूतनीकरणासाठी (Renovation) घराची पाहणी करत होते. तेव्हा त्यांना घराच्या मध्यभागी लाकडी फरशीखाली एक मोठा स्विमिंग पूल (Swimming Pool) असल्याचं दिसलं. जेव्हा या दाम्पत्यानं लाकडी फरशी तोडली तेव्हा त्यांना घरात मोठा खड्डा आढळून आला. पूर्ण फरशी तोडली असता, हा खड्डा म्हणजे स्वीमिंग पूल असल्याचं समजलं. `द सन`ने दिलेल्या वृत्तानुसार, घराच्या मध्यभागी हा पूल असल्याचं निदर्शनास आल्यावर या दाम्पत्याला जोरदार मानसिक धक्का बसला. हा तलाव बांधकाम करून बुजवल्याचं घर विकाणाऱ्या व्यक्तींनं त्यांना सांगितलं होतं. पण हा प्रकार समोर आल्यावर या दाम्पत्याला या घरात शिफ्ट होण्यात अडचण निर्माण झाली. ``फरशीच्या खाली मोठा तलाव असल्याचं समजताच आम्हाला धक्का बसला. हा तलाव सुमारे 12 फूट खोल आहे. घराच्या मध्यभागी असलेला हा मोठा खड्डा खूपच भीतीदायक आहे,`` असं एमिली यांनी सांगितलं. तसंच या घरात आम्हाला एक भला मोठा बाथटबही (Jacuzzi) आढळून आल्याचं या दाम्पत्यानं सांगितलं. कॉन्ट्रॅक्टरला याबाबत सांगितलं असता, त्याने खर्चाचं कारण पुढं केलं. या सर्व प्रकारामुळे एमिली आणि जेफ्री हादरून गेले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.