जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मध्यरात्री महिलेची छेड काढण्यासाठी यायचा 'भूत', अखेर कोर्टात समोर आलं या आत्म्याचं रहस्य!

मध्यरात्री महिलेची छेड काढण्यासाठी यायचा 'भूत', अखेर कोर्टात समोर आलं या आत्म्याचं रहस्य!

मध्यरात्री महिलेची छेड काढण्यासाठी यायचा 'भूत', अखेर कोर्टात समोर आलं या आत्म्याचं रहस्य!

मध्यरात्री एक सावली महिलेला स्पर्श करायची म्हणून घरात सीसीटीव्ही लावला, त्यानंतर जे सत्य समोर आलं, ते पाहून महिलाच्या पायाखालची जमीनच सरकली

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 1 सप्टेंबर : लोकांच्या मनात भूताबाबात अनेक समज गैरसमज असतात. भूता सारखी कोणतीही गोष्ट  नसते. तरी देखील ते आपल्या आजूबाजूला असल्याचा भास अनेक लोकांना होतो. असाच भास एका महिलेला झाला. परंतू त्यानंतर जेव्हा तिला या भूताचं सत्य समजलं तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ही घटना सिंगापूरची आहे, जेथे गृहनिर्माण आणि विकास मंडळाच्या सार्वजनिक निवासस्थानात एक महिला एकटी राहात होती. तेथे या महिलेला जाणवलं की, दिवसा येथे सर्वकाही सामान्य असायचं. परंतू रात्र झाली की, मात्र येथे विचित्र गोष्टी घडू लागतात. या महिलेला जाणवलं की, ती रात्री झोपेत असताना तिच्या जवळ कोणती तरी आत्मा येते. जी तिला स्पर्श करते. इशे नावाच्या या महिलेने तिच्यासोबत घडलेल्या या विचित्र घटनेची माहिती तिने तिच्या प्रियकराला दिली. दोघांनी गुपचूप खोलीत एक कॅमेरा लावला, ज्यावरून त्यांना या आत्माच्या शोध लागेल. त्यानंतर इशेने जे सीसीटीव्ही कॅमेरात पाहिलं, ते पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसला. हे वाचा : जगातील रहस्यमयी गाव, जिथे जन्म घेताच जाते दृष्टी; माणूसच नाही तर प्राणी देखील पाहू शकत नाही जग कारण तिच्यासोबत हे सगळं करणारा कोणताही भूत नाही तर तिचा घरमालक होता. आपल्यासोबत जे घडलं, त्याबद्दल तिने पोलिसात तक्रार केली. या प्रकरणाबाबत कोर्टात झालेल्या सुनावणीत ईशीने सांगितले की, रात्री तिच्या खोलीत सावली यायची. ती स्पर्श करायची यासोबतच ती तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावायची. खूप अंधार असल्याने तिला दुसरे काही दिसत नव्हते आणि ती लाइट लावायची तेव्हा ती सावली गायब व्हायची. या सावली शोधण्यासाठी अखेर तिने तिच्या खोलीत कॅमेरा बसवला. तेव्हा तिला कळले की, ती ज्याला सावली समजत होती तो प्रत्यक्षात तिचा ३८ वर्षांचा घरमालक होता. हे वाचा : इथे बनलाय गणपती बाप्पाचा आधारकार्ड, पण QR कोड स्कॅन केला तरच देणार दर्शन शिन मिन डेली न्यूजच्या वृत्तानुसार, महिलेने याबाबत घरमालकावर गुन्हा दाखल केला आहे. निवेदनात तिने म्हटले आहे की, गेल्या वर्षी मे महिन्यात तिने हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. काही वेळाने त्यांच्या घरमालकाने पार्टीच्या माध्यमातून त्यांचे स्वागत केले. यामध्ये ती दारू पिऊन खोलीत झोपायला गेली. महिलेच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्री तिला कोणीतरी तिचे चुंबन घेत असल्याचे जाणवले. सुरुवातीला तिला वाटले की कदाचित तिला बॉयफ्रेंड असेल. पण तिच्या प्रियकराच्या डोक्यावर केस नाहीत, तर या सावलीचे केस खूप दाट होते. नंतर कॅमेरा फुटेजमध्ये असे दिसून आले की, तो तिचा घरमालक आहे, जो हे सगळं कृत्य करत होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात