Home /News /viral /

'मी अजून जिवंत आहे'; सोशल मीडियावरील ती पोस्ट पाहून आमदारानं स्वतःच सांगितलं सत्य

'मी अजून जिवंत आहे'; सोशल मीडियावरील ती पोस्ट पाहून आमदारानं स्वतःच सांगितलं सत्य

सोशल मिडियावर वर चक्क एका आमदाराच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या (False news of MLA's death) पसरल्याची घटना घडली आहे. बिहारमधील बोचहांचे विद्यमान आमदार मुसाफिर पासवान (MLA Musafir Paswan) यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या सोशल मिडियाद्वारे प्रसारित झाल्यानंतर 'अरे अजून मी जिवंत आहे' असा खुलासा त्यांना सोशल मिडियाद्वारे करावा लागला आहे.

पुढे वाचा ...
    दिल्ली, 20 सप्टेंबर : सोशल मीडिया हा भारतातील लोकांसाठी प्रचंड आवडीचे आणि हक्काचे व्यासपीठ आहे. त्याचा वापर भारतातील अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळी करतात. त्यामाध्यामातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा हेतू त्यांचा असतो. सोशल मीडियाचे (Social Media) जसे फायदे आहेत तसे तोटेही अनेक आहेत. असाच दुर्दैवी प्रकार एका आमदाराबाबत घडला आहे. कारण सोशल मीडियावर चक्क एका आमदाराच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या (False news of MLA's death) पसरल्याची घटना घडली आहे. बिहारमधील बोचहांचे विद्यमान आमदार मुसाफिर पासवान (MLA Musafir Paswan) यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या सोशल मीडियाद्वारे प्रसारित झाल्यानंतर 'अरे अजून मी जिवंत आहे' असा खुलासा त्यांना सोशल मीडियाद्वारे करावा लागला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची मोठी चर्चा होत आहे. जेव्हा त्यांच्या निधनाची वार्ता ही परिसरात पसरली तेव्हा त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या कुटुंबीयांना शोक संवेदनांचे फोन करायला सुरूवात केली. एवढंच काय तर त्यांच्या मुलानेही त्यांचा मृत्यू झाला असल्याच्या बातमीला दुजोरा दिला. त्यामुळे या बातमीवर लोकांचा विश्वास बसला. लोकांनी थेट त्यांच्या वैयक्तीक फोनवर कॉल करायला सुरूवात केल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी तातडीने आपल्या समर्थकांना सोशल मीडिया खात्यावरून अजून मी जिवंत आहे. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवणे थांबवा, असं अवाहन केले. या बातम्या तेव्हा आल्या जेव्हा ते मागील काही काळापासून ते सातत्याने आजारी होते. आणि एका रूग्णालयात उपचार घेत होते. ठाण्यात MNS कार्यकर्त्यांचा तुफान राडा; टोल नाक्याची तोडफोड करतानाचा LIVE VIDEO काही दिवसांपासून त्यांचे पाटन्यातील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी भेटण्यासाठी मुकेश साहनी यांच्यासह चिराग पासवान यांनीही भेट दिली होती आणि त्यांच्या स्वास्थासाठी प्रार्थनाही केली होती. त्यानंतर ते बरे होऊन आपल्या घरी मुजफ्फरपूरला (Muzaffarpur) निघून गेले होते. त्यानंतर अचानक त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूच्या बातम्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Bihar, Mla, Social media, Social media viral

    पुढील बातम्या