मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ठाण्यात MNS कार्यकर्त्यांचा तुफान राडा; टोल नाक्याची तोडफोड करतानाचा LIVE VIDEO

ठाण्यात MNS कार्यकर्त्यांचा तुफान राडा; टोल नाक्याची तोडफोड करतानाचा LIVE VIDEO

कशेळी टोल नाक्याची तोडफोड करताना मनसेचे कार्यकर्ते...

कशेळी टोल नाक्याची तोडफोड करताना मनसेचे कार्यकर्ते...

आज सकाळी मनसेच्या (MNS) काही कार्यकर्त्यांनी कशेळी टोल नाक्याची तोडफोड (kasheli tollnaka Vandalism) केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल (Viral Video) होतं आहे.

भिवंडी, 20 सप्टेंबर: भिवंडी- ठाणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने कशेळी टोल नाक्यावर होणारी टोल वसुली बंद करावी, यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन (MNS Protest) केलं होतं. तसेच निर्धारित वेळेत भिवंडी- ठाणे रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत तर टोल नाक्याची तोडफोड करण्यात येईल, अशा इशारा मनसेने दिला होता. त्यानंतर आज सकाळी मनसेच्या (MNS) काही कार्यकर्त्यांनी कशेळी टोल नाक्याची तोडफोड (kasheli tollnaka Vandalism) केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल (Viral Video) होतं आहे.

आज सकाळी मनसेचे ठाणे जिल्हा सचिव संजय पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह भिवंडी - ठाणे रोडवरील कशेळी टोल नाका फोडून आपला राग व्यक्त केला आहे. त्यांनी बॅट आणि लाकडी दांडक्याच्या साह्याने टोल नाक्याच्या काचा फोडल्या आहेत. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली केली आहे. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत मनसेचे ठाणे जिल्हा सचिव संजय पाटील यांच्यासह दोघांना ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा-अखेर किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना, पुण्यात पोलीस अडवणार?

मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या या हल्ल्यात टोलनाक्याचं बरंच नुकसान झालं आहे. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने टोलनाक्याचं होणारं नुकसान टळलं आहे. पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर, त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

First published:

Tags: MNS, Thane, Toll naka