मुंबई : आपल्यापैकी अनेकांनी एकदा तरी विमाने प्रवास केला असेल. मग हा प्रवास लांबचा असोत किंवा जवळचा. विमान प्रवास हा आपला वेळ वाचवतो त्यामुळे खूप कमी वेळेत तुम्हाला कुठे पोहोचायचं असेल तर हा प्रवास फायद्या आहे. पण विमान प्रवासाचं तिकिट खूप महाग असतं, त्यामुळे ते सर्वांच्या खिशाला परवडणारं नसतं, ज्यामुळे लोक याने जास्त प्रवास करत नाहीत. काहींचं तर विमानेने प्रवास करण्याचं स्वप्न असतं. पण तुम्हाला माहितीय का की विमानाशी संबंधीत अशी काही गोष्टी आहेत, ज्याबद्दल क्रुमेंबर आणि विमान कंपनीला वाटत असतं की त्या प्रवाशांना कळू नयेत. त्या गोष्टी कोणत्या, चला पाहू.
1. विमानातील अनेक नट्स खुले असतात विमान उडताना 1-2 नव्हे तर त्याचे अनेक नट बोल्ड्स खुले असतात. हे पायलटला देखील ठाऊक असते. विमानाच्या राईट विंगचे दोन स्क्रू नेहमी खुले असतात. यामुळे विमान फिरवणं सोपं असतं. 2. इमर्जन्सी ऑक्सिजन मास्क फक्त 15 मिनिटांसाठी काम करतं फ्लाइटमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासली आणि तुम्ही मास्क घातलंत, तर असं समजू नका की आता तुमचं काम झालं. हा आपत्कालीन ऑक्सिजन मास्क तुम्हाला फक्त 15 मिनिटांसाठी ऑक्सिजन पुरवू शकतो. कधीकधी अशी परिस्थिती येते की पायलट तुम्हाला हवेचा दाब पाहाता योग्य ठिकाणी खाली घेऊन जाताना ऑक्सिजन मास्क घालायला सांगतो. तेव्हा तुम्हाला हा मास्क ३० सेकंदांच्या आत घालावा लागेल, नाहीतर तुम्ही बेहोश होऊ शकता. 3. फ्लाइटमध्ये एखाद्याचा मृत्यू झाल्यास, त्याला सीटवर बसवून ठेवतात. प्रवासात एखाद्याचा मृत्यू झाला तर क्रुमेंबर प्रवाशांना या विषयी माहिती पडू देत नाहीत. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेहाला सीटवरच बसवून ठेवलं जातं. जेणे करुन प्रवाशी घाबरु नये आणि आपातकालिन परिस्थिती ओढावू नये. 4. हेडफोन खूप जुने आणि वापरलेले असतात तुम्ही फ्लाइटमधील हेडफोन किंवा इअरफोन वापरत असाल तर लक्षात ठेवा की ते साफ केले जात नाहीत. हे हेडफोन यापूर्वी वापरले गेले असतात. जरी ते सीलबंद प्लास्टिकच्या पॅकमध्ये आले असले तरी ते जुने असल्याचे गृहीत धरले जाऊ शकते. 5. डायट कोक ग्लास मागितल्याने फ्लाइट अटेंडंट अडचणीत जर तुम्ही फ्लाइटमध्ये पेय मागितले तर ते बऱ्याचदा ग्लासमध्ये दिले जाते. पण सोडा सारखी पेये आणि विशेषत: डाएट सोडा, फ्लाइटमध्ये ग्लासमध्ये ओतण्यास जास्त वेळ लागतो. त्यांचे बुडबुडे स्थिर होण्यास वेळ लागतो आणि त्यामुळे ते अधिक अडचणीत येतात. ज्यामुळे ते बऱ्याचदा ग्लासात हे देत नाहीत. जगातील अशी ठिकाणं जेथे विमान उड्डाणावर बंदी, भारतातील ‘या’ भागाचाही समावेश 6. तुमच्या बोर्डिंग पासमध्ये लपलेले असतात रहस्य तुमच्या बोर्डिंग पासमध्ये असलेल्या 6-अंकी पीएनआरमध्ये केवळ त्या फ्लाइटची माहिती नसते, तर याच्या मदतीने तुम्ही फ्लाइटमध्ये किती वेळा चढता, पुढील प्रवासाचे बुकिंग केव्हा आहे, इत्यादी तपशील देखील काढता येतात. 7. आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये स्लीपिंग केबिन असतात जर तुम्हाला वाटत असेल की, फ्लाइट अटेंडंटना झोपायला जागा नसते, तर असं नाही, मोठ्या फ्लाइटमध्ये गुप्त केबिन असतात जेथे फ्लाइट अटेंडंट सहजपणे झोपू शकतात. या केबिनमध्ये अनेक बंक बेड बसवले आहेत. 8. पायलट झोपतात… हे वाचून तुम्हांला आश्चर्य वाटतं ना ? पण अनेकदा लांबचा प्रवास करताना एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर पायलट थोडावेळ आराम करतात. या वेळेस विमान ऑटो पायलट मोडवर असतं. तसेच पायलटच्या साथीला असलेला दुसरा पायलट त्यावेळी सगळं पाहात असतो. 9. प्रवाशांचं जेवणं पायलटला देत नाही अनेकदा तिकिटाच्या पैशामध्येच प्रवाशांच्या जेवणाचे देखील पैसे घेतले जातात. अनेकांना वाटतं की हे जेवण सगळ्यांसाठी असेल, पण प्रवाशांसाठी असलेलं जेवण पायलटसाठी नसतं. पायलेट्सच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्यासाठी खास जेवणाची सोय असते. 10. विमानातून लवकर बाहेर पडल्यांने होतो कंपनीला फायदा काम लवकर संपले तर कोणाला आवडत नाही? पण तुम्हाला माहित आहे का की फ्लाइट अटेंडंटला प्रत्येक फ्लाइटनुसार पगार मिळतो. अशा परिस्थितीत ते जितक्या लवकर मोकळे होतील तितक्या लवकर ते त्यांचं दुसरं काम सुरू करू शकतात.