जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'हा' छोटा छिद्र खूपच कामाचा, फोन खाली असलेला या छिद्राचं काम ऐकून तुम्ही चकित व्हाल

'हा' छोटा छिद्र खूपच कामाचा, फोन खाली असलेला या छिद्राचं काम ऐकून तुम्ही चकित व्हाल

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

फोनखाली असलेल्या या छोट्याशा छिद्राचं काम खूपच महत्वाचं, याबद्दल जाणून तुम्ही म्हणाल, अरेच्चा! हे तर मला माहितच नव्हतं

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 15 सप्टेंबर : आपल्याला जेव्हाही एखाद्या टेक्नोलॉजी संबंधीत गोष्ट विकत घ्यायची असते, तेव्हा आपण त्याबद्दल बरंच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. जसे की त्याची किंमत, फीचर, कॅमरा इत्यादी. परंतू असं असलं तरी आपल्याला आपल्या फोनबद्दल एका गोष्टीची माहिती नसते, ते म्हणजे या फोनला असलेल्या छोट्याशा छिद्राची. खरंतर आपण आपल्या नवीन फोनला मागून, समोरुन, त्याच सिम स्लॉट, मेमरी स्लॉट, कॅमेरा, इअरफोन जॅक, यूएसबी आणि लाऊडस्पीकरबद्दल संपूर्ण पाहातो. परंतू या छिद्राची माहिती घेत नाही. परंतू तुम्हाला माहितीय तो लहानसा छिद्र तुमच्या फोनसाठी खूपच महत्वाचा आहे. खरंतर हा छिद्र फोनच्या तळाशी, चार्जिंग पोर्टच्या अगदी बाजूला असतो. परंतू हे छिद्र काय करते किंवा ते कशासाठी वापरले जाते हे तुम्हाला माहिती आहे का? एक लहान छिद्र का आहे वास्तविक, स्मार्टफोनच्या चार्जिंग पोर्टच्या खाली असलेला छोटा छिद्र म्हणजे नॉइज कॅन्सलिंग मायक्रोफोन. हा मायक्रोफोन कसा काम करतो हे देखील आम्ही तुम्हाला सांगतो. हे वाचा : Flying Car: `या` कंपनीच्या उडत्या कारला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद; अल्पावधीतच विकल्या गेल्या कार जेव्हा तुम्ही कोणाला कॉल करता तेव्हा हा मायक्रोफोन सक्रिय होतो. तो सक्रिय झाल्यानंतर, तुमच्या आवाजाच्या दुसऱ्या बाजूला जाण्यास कोणतीही अडचण नाही. तुम्ही तुमचा आवाज दुसऱ्या बाजूला सहज पोहोचवू शकता. इतकेच नाही तर जेव्हाही आपण अशा ठिकाणी असतो जिथे खूप गोंगाट होत असतो आणि आपल्याला एखाद्याला तातडीचा ​​कॉल करावा लागतो तेव्हा आपणास त्रास होतो, परंतु हा छोटा छिद्र आपली समस्या दूर करते. ज्यामुळे आपण गोंगाटात देखील थोडं उंच आवाजात बोललो तरी समोरच्याला आपला आवाज ऐकू जातो. हे वाचा : Knowledge : कधी विचार केलाय लिफ्टमध्ये का असतो आरसा? चेहरा पाहण्यासाठी नाही, तर हे त्यामागचं खरं कारण तुम्ही यापूर्वी कदाचित या छिद्राकडे नीट पाहिलं नसेल, परंतू आता ही बातमी वाचल्यानंतर तुमचं लक्ष नक्कीच त्या छिद्राकडे जाईल आणि तुम्हाला त्या छोट्याशा छिद्राचं महत्न कळलं असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात