मुंबई 09 नोव्हेंबर : आपल्यापैकी सगळ्याच लोकांनी आयुष्यात एकदा तरी रेल्वेनं प्रवास केलाच असावा. हा प्रवास कमी खर्चीक असतो. तसेच यामुळे तुम्ही तुमच्या ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकता. हा प्रवास गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांच्याच खिशाला परवडणारा आहे. या लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करताना तुम्ही पाहिलं असेल की एका बोगीत किंवा एका डब्यात टॉयलेट असतात. जे लांबचा प्रवास करताना प्रवाशांसाठी खरंच खुप फायद्याचं आहे.
पण तुम्हाला हे माहित आहे का की ट्रेनमध्ये ही टॉयलेटची सुविधा आधीपासून नव्हती? हो हे खरंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्रेन सुरु झाल्यानंतर जवळ-जवळ 56 वर्ष यामध्ये टॉयलेट नव्हता.
मग आता प्रश्न हा उभा राहातो की ही सुविधा केव्हा आणि कशी सुरु करण्यात आली? या मागची संकल्पना नक्की काय आहे?
खरंतर 56 वर्षांपासून रेल्वेमध्ये टॉयलेटची सुविधा नव्हती. त्यात ट्रेनचा वेग देखील फार कमी होता, त्यामुळे विचार करा की त्यावेळेला, ट्रेनने लांबचा प्रवास करताना प्रवाशांची परिस्थीती काय झाली असावी.
हे ही वाचा : राजस्थानमधील ही 3 गावं मुलींसाठी नरकापेक्षा कमी नाही
अशा परिस्थितीत एक भारतीय होता ज्याने इंग्रजांना पत्र लिहून आपली समस्या सांगितली, त्यानंतर रेल्वेने या विनंती विचार केला आणि मग सुरु झाली रेल्वेमधील टॉयलेटची संकल्पना.
आता आपण थोडा इतिहास जाणून घेऊया
भारतीय रेल्वे 1853 मध्ये सुरू झाली. 16 एप्रिल 1853 रोजी देशातील पहिली पॅसेंजर ट्रेन मुंबई-ठाणेसाठी धावली. यानंतर ब्रिटीशांनी आणखी काही लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु केल्या.
1919 पर्यंत रेल्वे रुळांवर शौचालयाविनाच धावत होती. परंतू 1909 मध्ये रेल्वेला एक पत्र मिळाले, त्यानंतर ब्रिटिशांनी ट्रेनमध्ये शौचालये बांधण्याचा विचार केला आणि अखेर 1919 मध्ये शौचालय असलेली ट्रेन धावली. खरंतर हे एक कॉन्ट्रोवर्सी पत्र होतं.
हे ही वाचा : Fact About Tip : रेस्टॉरंटमध्ये TIP का देतात, याची सुरूवात केव्हा पासून झाली?
कॉन्ट्रोवर्सी म्हटलं की तुमच्या मनात हे आलंच असणार की हे पत्र कोणी लिहिलं?
ओखिल चंद्र सेन नावाचा एक प्रवासी होता. ज्याने इंग्रजांना आपलं दुखं सांगितलं आणि टॉयलेट बांधण्यासाठी विनंती केली. त्यांनी 2 जुलै 1909 रोजी रेल्वेला हे पत्र लिहिलं होतं.
पत्रात असं काय लिहिलं होतं?
ओखिल चंद्र सेन यांनी हा निर्णय घेतला की ते ब्रिटिशांना याबद्दल कळवतील आणि त्यांनी एक पत्र देखील लिहिलं, या पत्रात त्यांनी लिहिले की प्रिय महोदय, मी ट्रेनने अहमदपूर स्टेशनवर आलो आणि त्या दरम्यान माझे पोट दुखत होते आणि त्यामुळे मी हलकं होण्यासाठी खाली उतरलो.
काही वेळातच गार्डने शिट्टी वाजवली आणि ट्रेन सुरू झाली. यामुळे माझ्या एका हातात लोटा होता आणि दुसर्या हातात धोतर ते दोन्ही धरून मी धावत सुटलो आणि प्लॅटफॉर्मवर पडलो. तेव्हा माझे धोतरही उघडले, ज्यामुळे तेथील सर्व स्त्री-पुरुषांसमोर माझं हस्य झालं. तसेच माझी ट्रेन देखील सुटली. ज्यामुळे मला अहमदपूर स्टेशनवरच थांबावे लागले.
हे किती वाईट आहे की, टॉयलेटला गेलेल्या एका प्रवाशासाठी रेल्वे गार्डने काही मिनिटेही गाडी थांबवले नाही. मी तुम्हाला विनंती करतो की त्या गार्डला दंड ठोठवा. अन्यथा मी ही गोष्ट वर्तमानपत्रात सांगेन. तुमचा विश्वासू सेवक ओखिल चंद्र सेन.
अखेर त्यांच्या पत्राचा विचार ब्रिटीशांनी केला. खरंतर त्यांचं हे पत्र खूपच कॉन्ट्रोवर्सी ठरलं, पण यातून एक गोष्ट चांगली झाली की तेव्हा ब्रिटीशांनी ट्रेनमध्ये
टॉयलेट लावण्याचा विचार केला. या प्रकरणानंतर येणाऱ्या सगळ्या ट्रेनमध्ये आणि काही जुण्या ट्रेनमध्ये टॉयलेट बसवले गेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Train, Viral, Viral news