मराठी बातम्या /बातम्या /Viral /Fact About Tip : रेस्टॉरंटमध्ये TIP का देतात, याची सुरूवात केव्हा पासून झाली?

Fact About Tip : रेस्टॉरंटमध्ये TIP का देतात, याची सुरूवात केव्हा पासून झाली?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आपण टीव्ही, चित्रपट किंवा मित्रांकडून ऐकले आहे की, असे वेटरला टिप दिली जाते म्हणून आपण ती टिप देतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई 6 नोव्हेंबर : रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर शेवटी आपल्याला वेटर बिल घेऊन येतो. यामध्ये आपण आपल्या खाल्लेल्या जेवणाचे पैसे तर देतो. परंतू यानंतर आपण वेटरला काही पैसे टीप म्हणून देखील तो. टीपची ही रक्कम किती असू शकते, लोक ते स्वइच्छेने वेटरला देतात. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की आपण असं का करतो?

    आपण टीव्ही, चित्रपट किंवा मित्रांकडून ऐकले आहे की, असे वेटरला टिप दिली जाते म्हणून आपण ती टिप देतो. पण मुळातच टिप देण्याची पद्धत कशी सुरू झाली? त्यामागची कहाणी काय आहे? ही संस्कृती किंवा ट्रे़डीशन कसं बनलं?

    चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ

    TIP म्हणजे To Insure Promptitude?

    ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार 1706 साली 'टीप' हा शब्द प्रथम वापरला गेला. असेही म्हटले जाते की, TIP चा फूल फॉर्म To Insure Promptitude आहे. म्हणजेच टिप देणार्‍यास व्यक्तीला स्पेशल, चांगली आणि तत्पर सेवा दिली जाईल.

    यामागची पहिली कहाणी

    जेवण जेवल्यानंतर टिप देण्याची परंपरा ब्रिटीशांनी सुरू केली होती. ही प्रथा 1600 व्या दशकात सुरु झाली आहे. योगायोग म्हणजे या दशकात ब्रिटीशांनी भारताच्या मातीवर पाऊल ठेवले होते.

    हे ही वाचा : विमानातून 33 हजार फूट खाली पडूनही ‘ती’ जिवंत राहिली, नक्की असं काय घडलं?

    एका मीडिया वृत्तानुसार, 1600मध्ये, ब्रिटीश हवेलीमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना चांगली सेवा दिल्यामुळे थोड्या प्रमाणात रक्कम देण्यास सुरुवात केली गेली. त्याची सुरुवात कर्मचार्‍यांच्या कौतुकासाठी केली गेली. नंतर तो एक ट्रेंड बनला.

    यामागच्या आणखी काही कथा समोर

    तसे पहाता टिप देण्याच्या या गोष्टीला अनेक कथा सांगितल्या जातात. या दुसऱ्या कहाणीत असे सांगितले जाते की, foodwoolf वेबसाइटने 18 व्या शतकापर्यंत अमेरिकेत टिपिंगची सुरुवात झाली आहे.

    समाजातील मोठी, उच्च शिक्षित लोकं स्वत:चा क्लास दाखवण्यासाठी कामगार आणि सेवा देणाऱ्या वर्गाला अशी टिप द्यायचे. असं न्यूयॉर्कमधील कॉर्नेल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉटेल ऍडमिनिस्ट्रेशनमधील प्रोफेसर मायकल लिन यांनं मत आहे.

    परंतु लिन यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, याची सुरुवात फक्त 17 व्या शतकात ब्रिटनमध्ये झाली होती. जेव्हा विशेषत: मद्यपान करणारे लोकं वेटर किंवा नोकरांना टिप्स देत असत. कारण ते मद्यपान करणाऱ्या लोकंना दारु ओतून देतात किंवा त्यांचे ग्लास सांभाळतात.

    लेखक आणि शब्दकोषशास्त्रज्ञ सॅम्युएल जॉन्सन यांनी लिहिले आहे की, 18 व्या शतकातील कॉफी हाऊसमध्ये एक टिपीं जार होते. ज्याचा वापर इंग्लंडमध्ये सर्वत्र केला जाऊ लागला, याला बहूतेक लोकं शॉर्टमध्ये टिप म्हणून बोलू लागले. ज्यामुळे हा शब्द सर्वत्र ओळखू लागला.

    हे ही वाचा : बायको फोन उचलत नाही म्हणून त्याने सीसीटीव्ही तपासला आणि समोर आलं धक्कादायक सत्य

    टिपसंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

    तसे पहाता टीप देणे आपल्यावर अवलंबून असते. तुम्हाला ही टिप जबरदस्ती देण्यासाठी कोणीही भाग पाडू शकत नाहीत. जेव्हा रेस्टॉरंट्सने बिलात सर्व्हिस शुल्काची भर घालण्यास सुरुवात केली त्यामुळे लोकांनी काही प्रमाणात टिप देणे बंद केले.

    5 वर्षांपूर्वी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने (Department of Consumer Affairs) हे स्पष्ट केले होते की, रेस्टॉरंट बिलातील सेवा शुल्कहे पर्यायी आहे, अनिवार्य नाही. म्हणजेच, आपल्याला रेस्टॉरंटची सेवा आवडत नसेल तर आपण सेवा शुल्क देण्यास नकार देऊ शकता.

    रेस्टॉरंटमध्ये 5 ते 20 टक्क्यांपर्यंत सर्व्हिस चार्ज आकारला जातो. ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 नुसार जर एखाद्या ग्राहकास सेवा शुल्क म्हणून चुकीच्या मार्गाने पैसे भरण्यास भाग पाडले गेले असेल, तर तो कंज्यूमर फोरममध्ये तक्रार करू शकतात.

    First published:

    Tags: Marathi news, Shocking, Social media, Viral, Viral news