मुंबई, 21 नोव्हेंबर : स्मोकिंग (Smoking video) हे व्यसन म्हणजे सध्याच्या तरुणाईसाठी फॅशनच झाली आहे. फक्त तरुणच नव्हे तर तरुणीही बिनधास्तपणे सिगारेट किंवा हुक्का ओढताना दिसतात (Smoking shocking video) . त्यातही काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करताना दिसतात (Smoking stunt video) आणि हाच प्रयत्न त्यांना चांगलाच महागात पडतो. सध्या असेच काही व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत आहेत.
धूम्रपान करणं आरोग्यासाठी हानिकारक तर आहेच. पण स्मोकिंग करताना स्टंट करणं किंवा काहीही काळजी न घेता स्मोक करणं जीवावरही बेतू शकतं. बेस्ट व्हिडीओज ट्विटर अकाऊंटवर स्मोकिंगचे असे दोन खतरनाक व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत, जे पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.
स्मोकिंग करता करता एका तरुणाचा अख्खा चेहराच पेटला आहे, तर एका तरुणीचे केस पेटले आहेत. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. हे दोन्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर स्मोकिंग करताना काहीतरी हटके करणं दूर तुम्ही कदाचित स्मोकिंग करणंही सोडून द्याल.
हे वाचा - तरुणाने मगरीच्या जबड्यात घातलं आपलं डोकं आणि...; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
एका व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुणी हेअरस्टाइल किंवा हेअरकटसाठी बसली आहे. हेअर ड्रेसरने तिचे काही केस पुढे तिच्या चेहऱ्यावर सोडले आहेत.
— Best Videos 🎥🔞 (@CrazyFunnyVidzz) November 21, 2021
त्याचवेळी तरुणी हेअर ड्रेसरशी बोलता बोलता सिगारेट आपल्या तोंडात ठेवते आणि हातात लायटर घेऊन ती ते पेटवायला जाते. आपल्या चेहऱ्यावर केस सोडलेले आहेत, याचंही भान तिला बोलण्याबोलण्यात राहिलं नाही. त्यामुळे ती लायटर पेटवते आणि मग सिगारेटऐवजी तिचे केसच पेट घेतात.
हे वाचा - Pain Killer समजून तरुणीने गिळला हेडफोन; पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही
दुसऱ्या व्हिडीओ तर यापेक्षाही भयंकर आहेत. यामध्ये एका व्यक्तीच्या हातात सिगारसारखीच एक काचेची वस्तू आहे. त्यातून कसं स्मोक करायचं हे ही व्यक्ती समोरच्या व्यक्तीला समजावते.
— Best Videos 🎥🔞 (@CrazyFunnyVidzz) November 20, 2021
त्यानंतर ही व्यक्ती सिगार ओढायला दाते. जशी ती व्यक्ती ही सिगार ओढते तेव्हा आग पेटते आणि त्या व्यक्तीच्या अख्खा चेहराच पेटतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Smoking, Viral, Viral videos