नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : तुमच्यासोबतही असं कधीतरी झालं असेल की तुम्ही काहीतरी वेगळा पदार्थ खायला गेला मात्र चुकून त्याजागी दुसरंच काहीतरी खाल्लं. नंतर ही बाब लक्षात येताच आपणच स्वतःच्या या चुकीवर हसत बसतो. मात्र अमेरिकेच्या (United States News) वॉशिंग्टनमध्ये (Washington) राहणाऱ्या तरुणीसोबत जे घडलं ते अतिशय अजब होतं. या तरुणीनं पेनकिलर गोळीच्या जागी कानात लावायचे एअरपॉडच गिळले (Woman Swallowed Headphone).
Daily Star च्या वृत्तानुसार, ही घटना मॅसाच्युसेट्समध्ये राहणाऱ्या कार्ली या तरुणीसोबत घडली. बेडवर झोपलेली असतानाच तिने हातात पाणी घेतलं आणि वेदनाशामक गोळीच्या ऐवजी चुकून एअरपॉड गिळले. आपली चूक समजताच तिनं एअरपॉड गळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र असं होऊ शकलं नाही.
कार्लीनं दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ नोव्हेंबरला तेव्हा घडली जेव्हा ती आपल्या एका मैत्रिणीच्या घरी थांबली होती. तिथेच आपल्या बेडवर झोपली असताना तिनं हेडफोन गिळला. तिथून निघताना तिला जेव्हा आपल्या हेडफोनचा लेफ्ट सेट मिळाला नाही तेव्हा तिनं लोकेशन सर्च करायला सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे या एअरपॉडचं लोकेशन सतत तिच्यासोबतच दिसतं होतं. कार्लीनं जेव्हा Find My Airpod म्यूजिक सुरू केलं तेव्हा पोटातून तिला याचा आवाज येऊ लागला.
2 दिवसांनंतर महिलेनं पुन्हा एकदा एअरपॉडचं लोकेशन जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा ते ऑफ झाले होते आणि त्याचं लोकेशनही डिटेक्ट होत नव्हतं. यानंतर महिलेनं एक्स रे करून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की तिचा एखादा ऑर्गन डॅमेज झाला आहे की? यात समोर आलं की कार्लीच्या कोणत्याही अवयवाला नुकसान पोहोचलेलं नव्हतं आणि हेडफोन नैसर्गिक पद्धतीनंच बाहेर आला. लोकांनी तिच्या या पोस्टवर अनेक निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं तिच्या पोस्टवर मजेशीर कमेंट करत विचारलं की तू चुकून पेनकिलर कानात तर टाकली नाही ना?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Stomach pain