मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भयंकर! तरुणाने मगरीच्या जबड्यात घातलं आपलं डोकं आणि...; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

भयंकर! तरुणाने मगरीच्या जबड्यात घातलं आपलं डोकं आणि...; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

तरुण मगरीसोबत नको तो खतरनाक स्टंट करायला गेला.

तरुण मगरीसोबत नको तो खतरनाक स्टंट करायला गेला.

तरुण मगरीसोबत नको तो खतरनाक स्टंट करायला गेला.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 21 नोव्हेंबर : स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देणं किंवा स्वतः मृत्यूच्या दारात जाणं याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ (Animal video) काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social media viral) व्हायरल (Viral video) झाला होता. ज्यात एका व्यक्तीने चक्क मगरीच्या (Crocodile video) जबड्यात हात टाकला होता (Man hand in crocodile mouth). आता आणखी एक अशाच व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका तरुणाने मगरीच्या जबड्यात चक्क आपलं डोकंच टाकलं आहे (Man head in crocodile mouth).

मगर जी एका डावात आपला निशाणा साधते. सिंह, बिबट्या, वाघ अशा बलाढ्य प्राण्यांचाही तिच्यासमोर टिकाव लागत नाही. हे प्राणीही तिच्यापासून आपला जीव वाचवू शकत नाही. अशा मगरीशी माणसांनी पंगा घेतला. आधी एकाने तिच्या जबड्यात हात टाकला आणि आता दुसऱ्याने तिच्या जबड्यात आपलं डोकं टाकलं. मगरीसोबतचा तरुणांचा हा खरतनाक स्टंट पाहूनच धडकी भरते (Shocking video viral).

व्हिडीओत पाहू शकता एक मगर आपला जबडा उघडून आहे. तिच्यासमोर एक तरुण आहे. हा तरुण जमिनीवर घसरत मगरीच्या दिशेने येत आणि मगरीच्या उघड्या जबड्यात आपलं डोकं ठेवतो.

हे वाचा - Shocking! चक्क मगरीच्या जबड्यातून बाहेर पडला तरुण; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

nature_pets_travel_lover इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहूनच अक्षरशः आपल्याला घाम फुटतो पण तरुणाच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती नाही. तो अगदी निवांतपणे मगरीच्या तोंडात आपलं डोकं ठेवून बराच वेळ तसा राहतो. अगदी कॅमेऱ्याकडे पाहत हातही दाखवताना दिसतो आणि मगरही आपला जबडा तसाच उघडा धरून दिसते. हा खतरनाक व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

हे वाचा - जबड्यातील कुत्र्याला सोडून मगरीने ठोकली धूम; नेमकं काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीने मगरीच्या तोंडात आपला हात टाकला होता. मगरीसोबतचा हा नको तो स्टंट त्याला चांगलाच महागात पडला. मगर हल्ला करण्यात अगदीच पटाईत आहे, सवयीप्रमाणे तिनं इथेही तसंच काहीसं केलं. काहीच सेकंदाच मगरीनं या व्यक्तीचा हात आपल्या जबड्यात पकडला.

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

हृदयाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.  सुदैवाने मगरीच्या जबड्यातून आपला हात बाहेर काढण्यात हा व्यक्ती यशस्वी ठरला.

First published:

Tags: Crocodile, Shocking video viral, Viral, Viral videos, Wild animal