मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! Triplets भावांमध्ये तब्बल 7 वर्षांचं अंतर; आईच्या गर्भातून निघायला इतका वेळ?

बापरे! Triplets भावांमध्ये तब्बल 7 वर्षांचं अंतर; आईच्या गर्भातून निघायला इतका वेळ?

तिळांमध्ये 7 वर्षांचं अंतर पाहून लोक हैराण झाले आहेत.

तिळांमध्ये 7 वर्षांचं अंतर पाहून लोक हैराण झाले आहेत.

तिळांमध्ये 7 वर्षांचं अंतर पाहून लोक हैराण झाले आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

जेव्हा जुळ्या मुलांचा जन्म होतो तेव्हा त्यांच्या जन्मात फार अंतर नसतं. मात्र तरीही त्यांच्यामध्ये बरंच साम्य असतं. मात्र तुम्ही कधी असं काही ऐकलं आहे का, जुळ्यांमध्ये वर्षानुवर्षांचं अंतर आहे? तर साउथॅम्पटन (Southampton) मधील हॅम्पशायरमध्ये (Hampshire) राहणारे हेलेन आणि ओलिवर बेकर (Helen and Oliver Baker) यांना तीळं झाली. (Triplets) हैराण करणारी बाब म्हणजे यांच्यामध्ये तब्बल साडे 7 वर्षांचं अंतर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघे आयवीएफमुळे (IVF) साडे सात वर्षांच्या अंतराने जन्माला आले. हेलेन आणि ओलिवर बेकर यांनी दहा वेळा तरी फर्टिलिटी ट्रीटमेंट (Fertility treatment) घेतली. त्यांना 17,500 पाउंडच्या मेडिकल खर्चासाठी (Medical cost) आपलं घर विकावं लागलं. ज्यानंतर या दोघांचं स्वप्न पूर्ण झालं. फेब्रुवारी 2011 मध्ये त्यांचा पहिला मुलगा ह्यूगो (Hugo) याचा जन्म झाला.

हे ही वाचा-Video :...आणि रेल्वे ट्रॅकवर धावू लागली कार; हा प्रताप पाहून प्रवासीही हैराण

7 वर्षांनंतर जुळ्यांचा जन्म

यानंतर मॉडल हेलेन हिने आपले अनयूजड एम्ब्रियो फ्रीज (Freezed unused embryo) मध्ये साठवले. भविष्यासाठी तिने ही सोय करून ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 7 वर्षांनतर मोंटी आणि कोको (Monty and Cocco) ही जुळी मुलं झाली. यांचा जन्म 2018 मध्ये झाला होता. या तिनही भावांना ट्रिपलेट (Triplet) मानलं जातं. कारण ते एकाच वेळी कन्सिव्ह झाले होते. (Conceive) 41 वर्षीय हेलेन आणि तिच्या पत्नीला तिनही मुलांमध्ये अनेक साधर्म्य दिसून येतात.

या दोघांनी सांगितलं की, तिघांचे डोळे एकसाऱखे आहेत आणि ते नेहमी एकमेकांची वाक्य पूर्ण करतात.

पुढे तिने सांगितलं की, ह्यूगोच्या वयातील मुलं आपल्या भाऊ-बहिणींना वैतागतात. मात्र तिघे एकमेकांच्या खूप जवळ आहेत. तिघांची आवड-निवड सारखीच आहे.

First published:

Tags: Pregnancy, Viral