जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लग्न सुरू असतानाच अचानक आल्या नवरदेवाच्या सगळ्या एक्स गर्लफ्रेंड्स; नवरीसमोरच नको ते घडलं, अन् मग...

लग्न सुरू असतानाच अचानक आल्या नवरदेवाच्या सगळ्या एक्स गर्लफ्रेंड्स; नवरीसमोरच नको ते घडलं, अन् मग...

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

6 फेब्रुवारी रोजी या चिनी वराच्या एक्स गर्लफ्रेंड्सचा एक ग्रुप एक मोठा बॅनर धरून दिसला ज्यावर लिहिलं होतं, “आम्ही शेनच्या एक्स गर्लफ्रेंड्सची टीम आहोत, आज आम्ही तुला बर्बाद करू.”

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 23 फेब्रुवारी : अनेकवेळा लग्नाच्या वेळीच असं काहीतरी घडतं की नवरी आणि नवरदेव दोन्हीकडील लोक गोंधळात पडतात. असं म्हटलं जातं, की विवाहसोहळा कधीकधी खूप तणावपूर्ण आणि नाट्यमयही असू शकतो. जर वधू किंवा वराचे लग्नाआधी इतर कोणाशी संबंध असतील तर लग्नात मोठा गोंधळही निर्माण होऊ शकतो. असं घडल्याचे अनेक व्हिडिओही आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात लग्नातच नवरदेवाच्या एक्स गर्लफ्रेंड्सने येऊन मोठा गोंधळ घातला. एका चीनी लग्नात नवरदेवाच्या एक्स गर्लफ्रेंड्सने विरोध करत बॅनरबाजी केली आणि लग्नच मोडून टाकलं. हे प्रकरण चीनच्या युन्नानमधील आहे. एक्स गर्लफ्रेंड्सने या तरुणाने महिलांसोबत केलेल्या वागणुकीचा निषेध केला आणि त्याला नष्ट करण्याची धमकीही दिली. या महिन्यात, 6 फेब्रुवारी रोजी या चिनी वराच्या एक्स गर्लफ्रेंड्सचा एक ग्रुप एक मोठा बॅनर धरून दिसला ज्यावर लिहिलं होतं, “आम्ही शेनच्या एक्स गर्लफ्रेंड्सची टीम आहोत, आज आम्ही तुला बर्बाद करू.” वरात घेऊन दारात आला, पण ती चूक नवरदेवाला भोवली; ऐनवेळी नवरीचा लग्नास नकार अन् मग.. शेन असं या व्यक्तीचं नाव असून तो दक्षिण-पश्चिम चीनमधील युनान प्रांतातील रहिवासी आहे. चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, महिलांचा एक गट वराच्या लग्नाच्या ठिकाणाबाहेर एक मोठा लाल बॅनर धरलेला दिसत आहे. या सार्वजनिक निषेधाने लग्नातील पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं. पाहुण्यांनी या महिलांकडे चौकशी सुरू केली की बॅनरवर हे काय आणि का लिहिलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेनने कबूल केलं की, “यामुळे मला खूप लाज वाटली. आता माझी नवीन वधू माझ्यापासून विभक्त झाली आहे.” शेनने हे देखील सांगितलं की वधूचं कुटुंब या घटनेमुळे अस्वस्थ आहे आणि त्यांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना त्यांच्यापर्यंत आणि लग्नातील इतर पाहुण्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी शेनकडून स्पष्टीकरणही मागितलं. धक्कादायक! नोकरीसाठी जाळ्यात ओढळं आणि लग्नासाठी केली मुंबईच्या महिलेची विक्री शेनने स्पष्ट केलं की त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सनी त्याच्या लग्नावर आक्षेप घेतल्याने तो नाराज झाला नाही. त्याने कबूल केलं की तो समंजस नव्हता आणि पूर्वी तो एक वाईट बॉयफ्रेंड होता. त्याने कबूल केलं की, “मी लहान असताना अनेक मुलींना दुखावले.” मात्र वराने हे सांगितलं नाही की त्याने असं काय चुकीचं काम केलं होतं, ज्यामुळे त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सनी एकत्र येऊन लग्नातच त्याला धमकी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात