शिमला 23 फेब्रुवारी : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण असतो. मात्र बऱ्याचदा लग्नाच्या वेळीच असं काही घडतं, की हा आनंद क्षणात दुःखात बदलतो. असंच एक प्रकरण आता हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील बंगाना शहरातून समोर आलं आहे. यात एका तरुणीने ऐनवेळी लग्नास नकार दिला आणि दारात आलेली वरात परत पाठवली, कारण नवरदेवाकडील लोकांनी हुंड्याची मागणी केली. याबाबत स्थानिक पोलिसांनी माहिती दिली. धक्कादायक! नोकरीसाठी जाळ्यात ओढळं आणि लग्नासाठी केली मुंबईच्या महिलेची विक्री वधूच्या कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, तिचं लग्न हमीरपूरमधील गलोड येथील एका व्यक्तीशी होणार होतं. लग्नाची मिरवणूक घेऊन वर जेव्हा वधूच्या दारात पोहोचला तेव्हा त्याने मुलीच्या कुटुंबीयांकडे कार, मोठी रक्कम आणि सोन्याचे दागिने मागितले. जेव्हा नवरीला याबाबत माहिती मिळाली, तेव्हा तिने या लग्नास नकार दिला आणि वरात माघारी पाठवली. बंगाना पोलीस स्टेशनचे प्रमुख बाबुराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, वधूच्या बहिणीने वराच्या कुटुंबाविरुद्ध हुंड्यासाठी तक्रार दाखल केली आहे. कुटुंबातील एका सदस्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा वरातीच्या स्वागतासाठी जोरात तयारी सुरू होती आणि सर्व पाहुणे उपस्थित होते तेव्हा तरुणीनं अचानक लग्न रद्द केलं. प्रेम, लग्न, मग ब्लॅकमेल, निक्की यादव खून प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट, ‘मॅरेज सर्टिफिकेट’वरुन वाढला विषय 19 फेब्रुवारीला नवरदेव एका कार्यक्रमासाठी नवरीच्या घरी पोहोचला. मात्र, यावेळी त्याने हे सांगितलं नाही, की नवरीच्या कुटुंबीयांकडून त्याला काय पाहिजे. नवरीच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं की, मंगळवारी जेव्हा नवरीच्या घरच्यांनी मुलाच्या घरी आणखी एक कार्यक्रम केला, तेव्हा त्याचं वागणं तसं नव्हतं. सध्या याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र नवरीने वरात दारातून परत पाठवल्याने सर्व पाहुणेही निघून गेले. मात्र हुंड्याचं हे पहिलं प्रकरण नाही, अशी अनेक प्रकरणं दिवसेंदिवस समोर येत राहतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.