जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कमी पगार असल्याने कर्मचाऱ्याने लढवली अजब शक्कल; केलं असं काम की HR ही शॉक

कमी पगार असल्याने कर्मचाऱ्याने लढवली अजब शक्कल; केलं असं काम की HR ही शॉक

Photo Credit- Tiktok

Photo Credit- Tiktok

एका व्यक्तीने कमी सॅलरीचा (Salary Issue) विरोध करण्यासाठी अतिशय अजब पद्धत वापरली. हा व्यक्ती आपलं पूर्ण सामान घेऊन ऑफिसमध्येच शिफ्ट झाला (Employee Shifted in Office Due to Low Salary).

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 16 मार्च : अनेकजण ऑफिसमध्ये अगदी प्रामाणिक आणि भरपूर काम करतात. मात्र बऱ्याचदा कामाच्या मानाने कर्मचाऱ्यांना पगार अतिशय कमी (Low Salary) असतो. अशावेळी कर्मचारी याविरोधात आवाज उठवण्यासाठी निरनिराळे पर्याय अवलंबतात. मात्र नुकतं एका व्यक्तीने कमी सॅलरीचा (Salary Issue) विरोध करण्यासाठी अतिशय अजब पद्धत वापरली. हा व्यक्ती आपलं पूर्ण सामान घेऊन ऑफिसमध्येच शिफ्ट झाला (Employee Shifted in Office Due to Low Salary). पाण्यात जात बिबट्याने घेतला मगरीसोबत पंगा; शिकारीचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की त्याची सॅलरी इतकी कमी आहे की तो भाड्याच्या घरात राहू शकत नाही. यामुळे त्याने ऑफिसमध्येच राहाण्याचा निर्णय घेतला. तो आपल्या डेस्कजवळ स्लिपिंग बॅगमध्येच झोपू लागला. हे प्रकरण अमेरिकेतील आहे. TikTok वर सिमोन नावाच्या एका व्यक्तीने एक व्हिडिओ अपलोड करून या घटनेबद्दल सांगितलं. व्हिडिओमध्ये सिमोन आपल्या काही आवश्यक वस्तू आणि गादी घेऊन ऑफिस क्यूबिकलमध्ये शिफ्ट होताना दिसतो. त्याचं असं म्हणणं आहे, की तो घरातून आपलं संपूर्ण सामान घेऊन ऑफिसमध्ये राहाण्यासाठी आला आहे, कारण ऑफिसमधून त्याला इतकी सॅलरी मिळत नाही की तो एखादं घर भाड्याने घेऊ शकेल. सिमोनच्या म्हणण्यानुसार, त्याच्या ऑफिसमधील भरपूर लोक घरूनच काम करत आहेत. यामुळे ऑफिल रिकामंच असतं, अशात त्याला तिथे पुरेशी जागाही मिळते. सांगा पाहू हे मांजर जिने चढतंय की उरतंय? उत्तरात दडलंय तुमच्या जीवनाचं मोठं सत्य सिमोनने ऑफिसमधील आपल्या केबिनमध्ये कपडे, बॅग, स्लिपिंग बॅग हे सगळं ठेवलं असून ऑफिस पूर्णपणे घराप्रमाणे बनवलं आहे. तो अंघोळीसाठीही ऑफिसच्याच बाथरूमचा वापर करतो, तसंच आपल्या खाण्या-पिण्याचं सामानही ऑफिसच्या फ्रिजमध्येच ठेवतो. मात्र, तीन-चार दिवसातच ऑफिसने सिमोनला असं न करण्याचे निर्देश दिले. सोबतच HR ने त्याला सोशल मीडियावर ऑफिसमध्ये राहतानाचे व्हिडिओ हटवण्यासही सांगितलं. टिकटॉकवर त्याचा हा व्हिडिओ तब्बल 12 मिलियन वेळा पाहिला गेला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात