नवी दिल्ली 16 मार्च : तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की पाण्यातील सगळ्यात खतरनाक प्राणी म्हणजे मगर असते. त्यामुळे पाण्यातील मगरीसोबत कधीही पंगा घेऊ नये. मगरीला पाण्यातील राक्षस असंही म्हटलं जातं. पाण्यात मगरीसोबत पंगा घेणं म्हणजे, स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखं आहे. कारण जंगलात सिंह आणि पाण्यात मगरच राजा असते. अगदी लहानांपासून मोठे प्राणीही मगरीपासून दूर राहातात. कधीच पाहिला नसेल शिकारीचा असा VIDEO; पहिल्यांदाच हरणाऐवजी चित्त्याची कीव येईल तुम्ही अनेक असे व्हिडिओ पाहिले असतील ज्यात मगर पाण्यातून बाहेर येऊनही प्राण्यांची शिकार करते. इतकंच नाही तर अनेक व्हिडिओमध्ये तर मगर सिंह किंवा बिबट्याची शिकार करतानाही दिसते. यानंतर मगर आपल्या शिकारीला पाण्यात घेऊन जाते आणि मारून टाकते. या प्राण्यांचं मांस खाऊन ती आपली भूक भागवते. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ अतिशय वेगळा आहे (Video of Leopard Hunts Crocodile).
व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल (Shocking Video of Wild Animal). यात एक बिबट्या पाण्यात शिरून मगरीची शिकार करताना दिसतो. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की मगर पाण्यातून बाहेर येत आराम करत आहे. इतक्यात एका बिबट्याची नजर मगरीवर पडते आणि मगरीची शिकार करण्यासाठी तो पाण्यात उतरतो. VIDEO - शेरास सव्वाशेर! तोऱ्यात चॅलेंज देणाऱ्या तरुणालाच खोडकर माकडाने… व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बिबट्या दुरूनच मगरीची शिकार करण्याच्या तयारीत तिच्या जवळ पोहोचतो आणि अचानक तिची मान पकडतो. बिबट्याने ज्यापद्धतीने मगरीची शिकार केली, ते पाहून कोणीही थक्क होईल. एखाद्याच्या घरात शिरून त्यालाच मारणं अतिशय अवघड काम असतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बिबट्या मगरीला आपल्या दातांनी तोपर्यंत दाबून ठेवतो, जोपर्यंत मगरीचा मृत्यू होत नाही.