मुंबई, 16 मार्च : एक फोटो बरंच काही सांगून जातो. फोटोत बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. अशाच एका मांजराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक मांजर जिन्यावर दिसतं आहे. हे मांजर जिन्यावरून चढतं आहे की उतरतं आहे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि तुम्ही दिलेल्या उत्तरातच तुमच्या जीवनाचं मोठं सत्य लपलेलं आहे
(Cat photo viral).
मांजराचा हा फोटो म्हणजे एक ऑप्टिकल इल्युझन आहे. म्हणजे दृष्टीभ्रम. सोप्या भाषेत सांगायचं तर दिसतं तसं नसतं, डोळ्यांनी जे पाहतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं असतं किंवा जे असतं ते सहजासहजी दिसतच नाही. त्यामुळे असे फोटो पाहता पाहता चक्कर येते, त्याचं योग्य उत्तर सापडणंही अशक्य असतं.
आता या फोटोत पाहा मांजर जिन्यांवर आहे. मांजराचं हे चित्र अशा पद्धतीने रेखाटण्यात आलं आहे की लोक कन्फ्युझ झाले आहेत. काही जणांना हे मांजर जिने चढताना दिसलं. तर काही जणांना हे मांजर जिने उतरताना दिसत आहेत. काहींना तर चढताना आणि उतरतानाही दिसत आहे.
हे वाचा - VIDEO - शेरास सव्वाशेर! तोऱ्यात चॅलेंज देणाऱ्या तरुणालाच खोडकर माकडाने...
आता याचं उत्तर तुमच्या स्टेट ऑफ माइंडवर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही याकडे कोणत्या नजरेने पाहाल त्यावर हे अवलंबून आहे. जसं अर्धवट पाणी असलेला ग्लास. कुणी हा ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणतं तर कुणी हा अर्धा भरलेला आहे असं म्हणतं. हेच या फोटोच्या बाबतीतही आहे. आता या फोटोत तुम्हाला मांजर कसं दिसलं यावर तुमच्या जीवनातील सत्य काय आहे पाहुयात.
The Minds Journal ने हा फोटो शेअर केला होता. या जर्नलच्या आर्टिकलनुसार जर तुम्हाला मांजर जिने चढताना दिसत असेल तर तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. तुम्ही यश, प्रगतीची संधी, मार्ग शोधू शकता. तुमचा मेंदू आयुष्यात पुढे जाण्यासाठीच बनला आहे.
हे वाचा - VIDEO - समोर खतरनाक प्राणी आला, पळायचं सोडून व्यक्ती गिटार वाजवत राहिली आणि...
जर तुम्हाला मांजर जिने उतरताना दिसला तर तुमचा दृष्टिकोन निराशात्मक आहे. तुमच्या आयुष्यातील अनुभवांमुळे तुम्ही नकारात्मक झाला आहे. तुम्ही आयुष्यातील फक्त नकारात्मक बाजूच पाहता. तुम्ही कुणावरच लवकर विश्वास ठेवत नाही आणि तुम्हाला कुणी लवकर फसवूही शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.