Home /News /viral /

साडी नेसून ‘Manike Mage Hithe' गाण्यावर धरला ठेका; Dance Video चा इंटरनेटवर धुमाकूळ

साडी नेसून ‘Manike Mage Hithe' गाण्यावर धरला ठेका; Dance Video चा इंटरनेटवर धुमाकूळ

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महिला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या प्रिंटेड साडीमध्ये आहे. यात ती योहानीच्या Manike Mage Hithe गाण्यावर थिरकताना दिसते

  नवी दिल्ली 30 ऑक्टोबर : ‘मनिके मगे हिथे’ (Manike Mage Hithe) सिंहली भाषेतील हे गाणं श्रीलंकेपेक्षाही आजकाल भारतातच जास्त व्हायरल (Viral Song) होत आहे. सिंगर योहानी हिने गायलेल्या या गाण्याचा ट्रैंड संपण्याचं नावच घेत नाहीये. बॉलिवूड कलाकारांपासून (Bollywood Celebrities) सोशल मीडिया यूजर्सपर्यंत (Social Media Users) अनेकजण या गाण्यावर व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. हे गाणं इतकं व्हायरल झालं आहे, की काही लोक यावर रिल्स बनवत आहेत तर काही डान्स करताना दिसत आहेत. सध्या असाच आणखी एक नवा व्हिडिओ व्हायरल (Dance Video Viral) झाला आहे. यात एक महिला साडी नेसून ‘मनिके मगे हिते’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मुलींनी दुसऱ्या महिलेसोबत बापाला पकडलं रंगेहाथ; बेदम मारहाणीचा Video आला समोर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महिला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या प्रिंटेड साडीमध्ये आहे. यात ती योहानीच्या Manike Mage Hithe गाण्यावर थिरकताना दिसते. व्हिडिओमधील महिलेचे एक्सप्रेशन आणि डान्स मूव्ह पाहून सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by DancingAdah (@dancingadah)

  हा व्हिडिओ डान्स क्रिएटिव्ह इन्फ्लुएन्सर अदाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 10.1k फॉलोअर्स आहेत. अदाने शेअर केलेला हा व्हिडिओ 16 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. सोबतच हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होत आहे. आजीचा हटके जलवा! फक्त बोटांच्या जादूनेच 'सीधे दिले पे वार'; हा VIDEO एकदा पाहाच ‘मनिके मागे हिथे’ सतीशन रत्नायक यांचं गाणं आहे. मात्र, या गाण्याचं योहानी डिलोका डिसिल्वा हिच्या आवाजातील फिमेल व्हर्जन लोकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याचे बोल ड्यूलन ए आर एक्सने लिहिले आहेत. आतापर्यंत या गाण्याला 170 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Dance video, Viral video on social media

  पुढील बातम्या