नवी दिल्ली 08 ऑगस्ट : सोशल मीडियावर लग्नसमारंभातील व्हिडिओ (Wedding Videos on Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या विशेष पसंतीसही उतरतात. काही दिवसांपूर्वीच नवरीच्या पाठवणीचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वेडिंग व्हिडिओमध्ये प्रेम, दुःख, त्रास आणि मस्ती असे सर्वच इमोशन्स दिसतात. नवरी अन् नवरदेवाचा हा व्हिडिओ (Video of Bride and Groom) सर्वांचीच मनं जिंकत आहे.
VIDEO: कपड्यावरुन लग्नातच भिडले दोन पक्ष; धाडकन नवरीच्या अंगावर कोसळले अन्...
सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Instagram Videos) नवरदेव आणि नवरी एकत्र बसलेले दिसतात. लग्नातील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर कदाचित नवरीबाईची पाठवणी सुरू आहे. यामुळे, इमोशनल झालेली नवरी (Emotional Bride) आपल्या डोळ्यातून आलेले अश्रू पुसत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. शेजारी बसलेला नवरदेव तिला आपल्या डोळ्यांनी खुणवून शांत होण्यास सांगत आहे. या जोडप्याकडे पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हसू येईल.
View this post on Instagram
मैदान सोडून अचानक प्रेक्षकांकडे धावत आला बैल; VIDEO मध्ये पाहा पुढे काय घडलं
नवरदेवानं केलेल्या या इशाऱ्यानंतर नवरी शांत होऊन हसू लागते आणि नंतर अचानक नवरदेवाकडे पाहून डोळा मारते. नवरीला आनंदी पाहून नवरदेवही हसू लागतो. हा व्हिडिओ Witty Wedding नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 1 लाख 80 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. नवरदेव आणि नवरीची बॉन्डिंग सर्वांच्याच विशेष पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Wedding video