• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • हत्तीची दादागिरी! कर्मचाऱ्यांच्या हातातून केळी हिसकावून घेतली अन्...; कधीही पाहिला नसेल असा VIDEO

हत्तीची दादागिरी! कर्मचाऱ्यांच्या हातातून केळी हिसकावून घेतली अन्...; कधीही पाहिला नसेल असा VIDEO

एक हत्ती मस्तीखोर मुलांप्रमाणे प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या हातातील केळी हिसकावून घेताना दिसतो (Elephant Snatches Banana) . हा हत्ती कर्मचाऱ्यांच्या हातातील केळी हिसकावून खातो आणि नंतर पुढे निघून जातो

 • Share this:
  नवी दिल्ली 08 ऑक्टोबर : प्राणी जितके छोकादायक असतात तितकेच प्रेमळही असतात (Cute Animals) . विशेषतः हत्ती तर असा प्राणी आहे, जो दिसायला अगदी बलाढ्य (Giant Elephant) असला तरीही तो फार लवकर आक्रमक होत नाही. मात्र, हत्तीची मस्ती सर्वांचंच मन जिंकून घेते. गजराच्या मस्तीचा एक असाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Funny Video of Elephant) होत आहे. मंडपातच प्रपोज करणाऱ्या नवरदेवाची फजिती; ऐनवेळी नवरीनं नकार दिला अन्..; VIDEO हत्तीचा हा व्हिडिओ फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओ सिंगापूरमधील प्राणीसंग्रहालयातील आहेत. यात एक हत्ती मस्तीखोर मुलांप्रमाणे प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या हातातील केळी हिसकावून घेताना दिसतो (Elephant Snatches Banana) . हा हत्ती कर्मचाऱ्यांच्या हातातील केळी हिसकावून खातो आणि नंतर पुढे निघून जातो. हा व्हिडिओ (Naughty Elephant Video) नक्कीच तुमच्याही चेहऱ्यावर हसू आणेल. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की सिंगापूरच्या प्राणीसंग्रहालयात (Singapore Zoo) एका ठिकाणी दोन कर्मचारी बसलेले आहेत. निवांत वेळेत हे दोघंही केळी खात आहेत. हे दोघंही केळी सोलून खात असतानाच तिथे हत्तीची एण्ट्री होते. हत्ती मस्तीखोर बाळाप्रमाणे तिथे जातो आणि त्यांच्या हातातील केळी एक-एक करून हिसकावून घेतो. हत्ती कर्मचाऱ्यांच्या हातातील केळी हिसकावून ती खाऊन घेतो आणि ऐटीत तिथून निघून जातो. कर्मचारी त्याच्याकडे एकटक पाहत राहतात. मात्र, त्याला काहीच फरक पडत नाही. मोठ्या हुशारीनं सोनाराच्या दुकानात चोरी करत होतं कपल पण...; पाहा Shocking Video हत्तीचा हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत 34 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ रिट्विटही केला आहे. हत्तीची ही स्टाईल नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे. एका यूजरनं लिहिलं, बाळ ते बाळच असतं. तर, दुसऱ्या एका यूजरचं म्हणणं आहे की हत्ती चोरी नाही तर दादागिरी करत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: