नवरदेवानं नवरीला सरप्राईज देत सर्वांसमोरच प्रपोज करण्यासाठी तिचा हात हातात मागितला. सुरुवातीला नवरीनं यासाठी नकार दिला, मात्र नवरदेवानं वारंवार म्हल्यानंतर तिनं अखेर आपला हात त्याच्या हातात दिला. यानंतर नवरदेवानं अतिशय रोमॅन्टिक पद्धतीनं गुडघ्यावर बसत नवरीला अंगठी घातली अन् प्रपोज केलं (Romantic Video of Groom and Video). बापरे! एका पक्षासाठी एवढा त्याग? तरुणीनं 2 वर्षांपासून बाहेर फिरणंही सोडलं हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोक अतिशय भावुक आणि इम्प्रेस झाले. सर्वात सुंदर क्षण तर तो होता जेव्हा नवरीदेखील आपल्या नवरदेवाला प्रपोज करण्यासाठी गुडघ्यावर बसली. हे पाहून सगळेच हैराण झाले. नवरदेवालाही वाटलं नव्हतं की नवरी त्याला या पद्धतीनं सरप्राईज देईल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर witty_wedding नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे तर अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.