जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दयाळू हत्ती! महिला भावुक झाल्याचं दिसताच गजराजनं जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल अवाक, VIDEO

दयाळू हत्ती! महिला भावुक झाल्याचं दिसताच गजराजनं जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल अवाक, VIDEO

दयाळू हत्ती! महिला भावुक झाल्याचं दिसताच गजराजनं जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल अवाक, VIDEO

या व्हिडिओमध्ये दिसतं की सुरुवातीला हत्ती महिलेनं घातलेली टोपी आपल्या सोंडेने काढतो आणि तोंडात टाकतो (Elephant eat woman’s Hat). हे पाहून महिला थोडी नाराज होते

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 19 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social Media) तुम्ही अनेकदा निरनिराळे व्हिडिओ पाहिले असतील. यातील काही व्हिडिओ पाहून तुम्हालाही डोळ्यावर विश्वास बसला नसेल. अनेकदा सोशल मीडियावर हैराण करणारे व्हिडिओ समोर येतात. तर अनेकदा हे व्हिडिओ अतिशय विनोदी असतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक मजेशीर व्हिडिओ दाखवणार आहोत. यात एक हत्ती महिलेसोबत मस्ती करताना दिसतो (Funny Video of Elephant). अजबच! माणूस नव्हे तर झाडाच्या प्रेमात पडली महिला; अखेर घेतला मोठा निर्णय ट्विटर अकाऊंट फनी सप्लायवर काही दिवसांपूर्वीच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला गेला. हा व्हिडिओ पाहून लोक हैराणही झाले आहेत आणि खळखळून हसतही आहेत. व्हिडिओमध्ये एक हत्ती आणि हॅट घातलेली महिला दिसत आहे. व्हिडिओ एखाद्या जंगलाच्या परिसरात किंवा नॅशनल पार्कमधील असल्याचं जाणवतं.

जाहिरात

या व्हिडिओमध्ये दिसतं की सुरुवातीला हत्ती महिलेनं घातलेली टोपी आपल्या सोंडेने काढतो आणि तोंडात टाकतो (Elephant eat woman’s Hat). हे पाहून महिला थोडी नाराज होते मात्र तरीही चेहऱ्यावर हास्य आणते. हत्तीच्या जवळच ती उभा असल्याने ती थोडी घाबरत असल्याचंही जाणवतं. महिला हसतच समोर उभा असलेल्या लोकांना सांगते की ती हॅट तिच्या बहिणीने तिला दिली होती. यादरम्यान हत्ती काहीही हालचाल न करता तिथेच उभा असतो. महिला या हत्तीला विचारते की तू माझी टोपी मला परत देशील का. हे ऐकताच हत्ती आपली सोंड तोंडाच्या दिशेने घेऊन जातो आणि टोपी बाहेर काढून महिलेला देतो. हे पाहून समोर उभा असलेले लोक आनंदाने ओरडू लागतात.

OMG..! महाराष्ट्रात एकच चर्चा, ‘या’ म्हशीला पाहण्यासाठी जमतेय लाखोंची गर्दी

ट्विटरवर अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 1.6 कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 3 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले असून यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे माणसं लहान मुलांसोबत मस्ती करताना त्यांच्या वस्तू लपवतात तशीच मस्ती हत्तीने महिलेसोबत केली आहे. तर आणखी एकाने लिहिलं, की ही महिला अतिशय नशीबवान आहे कारण तिला हत्तीचं इतकं प्रेम मिळालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात