असिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली, 19 डिसेंबर: सांगलीतील (Sangli) एक रेडा (Buffalo Bull) सध्या बऱ्याच चर्चेत आहे. या रेड्याची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. चर्चेत असलेल्या या रेड्याचं नाव गजेंद्र आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) आयोजित केलेल्या आठव्या कृषी, पशु, पक्षी प्रदर्शनात हा रेडा आला होता. ज्यांनी ज्यांनी हा रेडा पाहिली ते या रेड्याला पाहतच राहिले. संपूर्ण परिसरात सर्वत्र गजेंद्रची होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना या जातीचा रेडा खरेदी करायची इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा त्यांचा विश्वास आहे. 80 लाखांचा रेडा या रेड्याचे वजन सुमारे दीड टन म्हणजेच 1500 किलोची आहे. त्याची किंमत तब्बल 80 लाख रुपये आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मंगसुळी गावात राहणारे शेतकरी विलास नाईक यांचा हा रेडा आहे. तो दिसायला खूप जड आणि आरोग्यदायी असल्यामुळे त्यांनी त्याचं नाव गजेंद्र ठेवलंय. हा रेडा पाहण्यासाठी दूरवरून लोक येत आहेत. तसेच या रेड्यासोबत सेल्फी काढण्यासाठीही खूप गर्दी होत असते. या रेड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रेडा दररोज 15 लिटर दूध पितो हा रेडा दररोज 15 लिटर दूध पितो. याशिवाय त्याला हिरवे गवत आणि दिवसातून चार वेळा ऊस खायला दिला जातो. या प्रकारचा प्राणी पुनरुत्पादनासाठी पाळला जातो. त्यांच्या शुक्राणूंपासून चांगल्या जाती निर्माण होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. हेही वाचा- Omicron चा धोका..! ‘या’ देशात लवकरच लागणार Lockdown? नियमावली तयार चांगल्या प्रतीच्या रेड्यांमुळे उत्पन्नाचा फायदा होईल, असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे. मात्र त्यांची काळजी घेणे देखील सोपं नाही. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे. त्यांचा सांभाळ सामान्य म्हशी आणि रेड्यांपेक्षा खूप जास्त असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.