Home /News /viral /

प्रेयसीसोबत थट्टा करणं पडलं महागात; आता तिची सेवा करण्यात जातो दिवस

प्रेयसीसोबत थट्टा करणं पडलं महागात; आता तिची सेवा करण्यात जातो दिवस

असं म्हणतात जर जीवन शांततेत सुरू असेल तर जास्त पंगा घेऊ नये. एका तरुणाने अशीच काहीशी चूक केली आहे.

    असं म्हणतात जर जीवन शांततेत सुरू असेल तर जास्त पंगा घेऊ नये. एका तरुणाने अशीच काहीशी चूक केली आहे. या तरुणाने आपल्या प्रेयसीच्या फोटोचा (Girlfriend’s Picture) वापर करीत डेटिंग अॅपवर (Tinder Dating App) प्रोफाइल केली. यानंतर मात्र त्याची अवस्था अशी झाली की गर्लफ्रेंडसाठी (Girlfriend) जेवण करण्यापासून तिची सेवा करण्यापर्यंत सर्व काम तोच करतो. थट्टा-मस्करीत हे प्रकरण सुरू झालं होतं. या तरुणाचं म्हणणं होतं की, त्याला आपल्या गर्लफ्रेंडपेक्षा चांगली मुलगी मिळू शकते. या नात्यात कोणाची पॉवर जास्त असल्याचं शोधण्याचं दोघांनीही ठरवलं. यानंतर प्रियकराने डेटिंग अॅप टिंडरवर आपल्या प्रेयसीच्या फोटोचा वापर करीत प्रोफाइल तयार केली. हे ही वाचा-VIDEO: पुण्यात कुलूप तोडून शटर उचकटलं; 2मिनिटात मेडिकलमधल्या लाखो रुपयांवर डल्ला Tinder Profile ची कमाल तरुणासोबत जे काही झालं ते खरंच चांगलं नव्हतं. त्याने टिंडर प्रोफाइल अॅक्टिवेट केलं आणि अवघ्या तासाभरात 1300 लाइक्स मिळाले. यानंतर मात्र तरुणाची अवस्था खराब झाली. तो आपल्या प्रेयसीसाठी स्वयंपाक करतो, तिच्या कपड्यांची घडी घालतो, याशिवाय तिचे पाय दाबण्यासाठीही तयार झाला. इतकच नाही हे लाइक्स 1865 पर्यंत पोहोचल्यानंतर तरुणाची अवस्था अधिकच बिघडली. आता गर्लफ्रेंडच्या प्रोफाइलवर 2250 लाइक्स आले आहेत.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Girlfriend, Tinder, Viral

    पुढील बातम्या