नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर: सोमवारी रात्री 8.30 नंतर Whatsapp, Facebook आणि Instagram या फेसबुक संचलित तीनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची कनेक्टिव्हिटी अचानक गेली. सोशल मीडिया अचानक थंड(WhatsApp, Instagram, Facebook down globally) झाल्यामुळे अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तिशी संवाद साधण्यासाठी मोठा पेच निर्माण झाला. मात्र, कोणत्याही विचारात न पडता खंडित सेवेमध्ये संवाद साधण्यासाठी बाप-लेकानं थेट क्रिकेट कॉमेंट्रीचा आधार घेतला.
सर्वत्र सध्या आयपीएलचा (IPL 2021)फिव्हर पाहायला मिळत आहे. काल दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स( DC vs CSK ) यांच्यात सामना रंगला होता. सामन्या दरम्यान संपूर्ण तीनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अचानक खंडित झाल्याने सर्वत्र खळबळ माजली. अशात या बाप-लेकानं व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स ( DC vs CSK )या रंगलेल्या सामन्याची मदत घेतली.
दिल्ली कॅपिटल्सच्या लाईव्ह कॉमेंट्री मध्ये विन्नू नावाच्या मुलाच्या वडिलांनी एक मॅसेज टाईप केला. त्यात त्यांनी लिहिलं की, व्हॉट्सअॅप डाऊन झालं आहे, परंतु तू cricinfo ची कॉमेंट्री वाचत असशील हे मला माहित्येय. त्यामुळे कृपया माझा फोनचा रिचार्ज कर... त्यावर विन्नूनं भन्नाट उत्तर दिलं. त्यानं लिहिलं, Cricinfo वर कमेंट कशी लिहायची हे तुम्हाला माहित आहे, तर तुम्ही स्वतः रिचार्ज करू शकता.
When WhatsApp is down but you need to communicate with family. #IPL2021 pic.twitter.com/BiM2OQaLnA
— Sreshth Shah (@sreshthx) October 4, 2021
बाप-लेकाचं क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये भन्नाट चॅटिंग सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Facebook ची मालकी असलेल्या सगळ्या सोशल मीडिया साइट्सना भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे सोमवारी रात्रीपासून अडचणी येऊ लागल्या. Facebook, Instagram, Whatsapp बंद असल्याचे मेसेज ट्विटरवर (twitter trend)फिरत होते.
Facebook च्या वेबसाइटवर याबद्दल दखल घेण्यात आली. Sorry, something went wrong. We're working on it and we'll get it fixed as soon as we can 'क्षमा करा, काहीतरी बिघडलं आहे. आम्ही ते शोधायचा प्रयत्न करत आहोत. लवकरात लवकर आम्ही दुरुस्ती करू', असा मेसेज facebook ने त्यांच्या वेबसाइटवर केला होता.
आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सवर (DC vs CSK)) शेवटच्या ओव्हरमध्ये रोमांचक विजय मिळवला आहे. याचसह दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, Delhi capitals