जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! चक्क हत्तीने रेखाटलं अतिशय सुरेख चित्र; VIDEO पाहून थक्क व्हाल

OMG! चक्क हत्तीने रेखाटलं अतिशय सुरेख चित्र; VIDEO पाहून थक्क व्हाल

OMG! चक्क हत्तीने रेखाटलं अतिशय सुरेख चित्र; VIDEO पाहून थक्क व्हाल

Shocking video: व्हिडिओमध्ये (Viral Video of Elephant) तुम्ही पाहू शकता की हत्तीने आपल्या सोंडीमध्ये एक स्केच पेन पकडला आहे आणि समोर बोर्डवर तो आपलं चित्र काढत आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 05 फेब्रुवारी: जगात असे अनेक लोक आहेत ज्यांच्यामध्ये निरनिराळ्या कला आहेत. विशेषतः पेटिंगबद्दल बोलायचं झालं तर हे अतिशय अवघड काम आहे. मात्र काही लोक अगदी सहज पेटिंग करतात. असे लोक आपल्या कलाकारीने लोकांचं मन जिंकतात. मात्र, तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला चित्र काढताना पाहिलं आहे का? कदाचित याचं उत्तर नाही असेल. कारण सहसा प्राणी कधीही चित्र काढताना दिसत नाहीत. मात्र, सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओमध्ये (Elephant Draw Beautiful Painting) एक हत्ती अतिशय सुंदर चित्र काढताना दिसतो, तेही स्वतःचं चित्र. इतका इमानदार चोर तुम्ही कधीही पाहिला नसेल; घराबाहेर ठेवून गेला मजेशीर चिठ्ठी व्हिडिओमध्ये (Viral Video of Elephant) तुम्ही पाहू शकता की हत्तीने आपल्या सोंडीमध्ये एक स्केच पेन पकडला आहे आणि समोर बोर्डवर तो आपलं चित्र काढत आहे. तो इतकं सुंदर चित्र रेखाटत आहे, जे पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही. सुरुवातीला हत्ती सोंड काढतो, यानंतर चार पाण आणि मग शेवटी शेपटी रेखाटतो. हत्तीला अशाप्रकारे पेंटिंग करताना पाहून कोणीही हैराण होईल. हत्तीला असंच समजदार प्राणी म्हटलं जात नाही. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही विश्वास बसेल की हत्ती खरंच समजदार असतात.

जाहिरात

हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी प्रवीण अंगुसामी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. अवघ्या 45 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 27 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर 2 हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. सोशल मीडिया यूजर्सनी व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

बापरे! Back flip मारताच जमिनीवर धाडकन आदळलं डोकं आणि…; VIDEO पाहूनच घाबरले लोक

अनेकांनी हत्तीच्या या टॅलेंटचं कौतुक केलं आहे. एका यूजरने लिहिलं, हत्तीला नक्कीच प्रशिक्षण दिलं गेलं असणार. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, याला म्हणतात काहीच अशक्य नाही. तर अनेकांनी यावर कमेंट करत म्हटलं की खरंच हत्तीने इतकं सुंदर पेटिंग केलं आहे, यावर विश्वास बसत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात