Home /News /viral /

इतका इमानदार चोर तुम्ही कधीही पाहिला नसेल; घराबाहेर ठेवून गेला मजेशीर चिठ्ठी

इतका इमानदार चोर तुम्ही कधीही पाहिला नसेल; घराबाहेर ठेवून गेला मजेशीर चिठ्ठी

रॉबिन आणि कॅथरीन यांनी ख्रिसमसच्या वेळी आपल्या घराच्या बाहेर एक 5 फूट उंच मुर्ती ठेवली होत. ही मूर्ती प्रसिद्ध कॅरेक्टर नटक्रॅकर सैनिकाची होती

    नवी दिल्ली 05 फेब्रुवारी: चोरी आणि ईमानदारी यांचं दूर-दूरपर्यंत काहीही नातं नाही. कल्पना करा की तुमच्या घरातून एखादं सामान चोरी झालं तर चोर नंतर पुन्हा ते त्याच ठिकाणी आणून ठेवेल, असा विचारही तुमच्या मनात येईल का? तेदेखील एका खास नोटसोबत. सहाजिकच असा विचार कोणाच्याही डोक्यात येणार नाही आणि सहसा अशा घटना कधी घडतही नाहीत. स्टेजवरच अचानक बदलला नवरीचा मूड; मग जे केलं ते पाहून नवरदेवही लाजला, VIDEO इंग्लंडमधील डॉरसेटमधील एका कपलसोबत मात्र अशी घटना घडली (Weird Incident of Theft). रॉबिन आणि कॅथरीन यांनी ख्रिसमसच्या वेळी आपल्या घराच्या बाहेर एक 5 फूट उंच मुर्ती ठेवली होत. ही मूर्ती प्रसिद्ध कॅरेक्टर नटक्रॅकर सैनिकाची होती. कॅथरीन याला प्रेमाने कॅसर म्हणत असे. मूर्ती इतकी जड होती की उचलून नेण्यासाठीही कमीत कमी दोन लोकांची मदत लागेल. मात्र ख्रिसमसच्या आधी एक दिवस कॅथरीन आपल्या घराबाहेर आली, तेव्हा तिला ही मूर्ती इथे दिसली नाही. कॅथरीलनला यामुळे हे अतिशय अजब वाटलं कारण ती आणि तिचा पती घरातच होते. तरीही मूर्ती चोरी झाली. त्यांना आवाजही ऐकू आला नाही. एवढी जड मूर्ती अगदी आरामात एकाच व्यक्तीला घेऊन जाणं शक्य नव्हतं. ही घटना अजब तेव्हा झाली जेव्हा चोराने एका मजेशीर नोटसोबत ही मूर्ती पुन्हा जागेवर आणून ठेवली (Thief Left Funny Note). इतकंच नाही तर त्या जागेवर असलेली सर्व लहान झाडं त्याने अगदी व्यवस्थितपणे बाजूला ठेवून, मूर्ती आपल्या जागेवर ठेवली. सोबतच एक मजेशीर नोटही सोडली. यात लिहिलं होतं, ख्रिसमससाठी हे उधार दिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या वर्षी याच काळात याची गरज पडेल. बापरे! Back flip मारताच जमिनीवर धाडकन आदळलं डोकं आणि...; VIDEO पाहूनच घाबरले लोक यावर्षी तर चोराने आपला कारनामा दाखवलाच मात्र पुढच्या वर्षीही चोरीची धमकी देऊन गेला. ही स्टोरी व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कॅथरीन आणि रोबिनला वेगवेगळे सल्ले दिले. अनेकांनी इथे कॅमेरा लावण्याचा सल्ला दिला, जेणेकरून हा चोर पुढच्या वर्षी पुन्हा आल्यास त्याला पकडणं शक्य होईल. तर अनेकांनी कॅसर बाहेर न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Funny video, Robbery, Shocking news, Theft, Write a letter

    पुढील बातम्या