मुंबई, 04 फेब्रुवारी : फेमस होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सोशल मीडिया. त्यामुळे इथं प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करतात. अगदी एखाद्या फिल्ममधील गाणं, डान्स, डायलॉगच नाही तर खतरनाक स्टंटही करताना दिसतात (Stunt video). असंच भयानक स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच काळजाचा ठोका चुकतो (Back flip video). धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे. बॅक फ्लिप मारणं तसं सर्वांनाच जमत नाही. ते करणं तसं कठीणच आहे आणि जमलं तरी ते सांभाळून करायला हवं नाहीतर गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो. असंच बॅक फ्लिप एका वेगळ्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. जे त्याला चांगलंच भारी पडलं आहे. बॅक फ्लिप मारताना तो धाडकन डोक्यावर आपटला. अवघ्या काही सेकंदाचाच हा व्हिडीओ आहे, पण खूप धक्कादायक आहे. व्हिडीओत पाहू शकता एक तरुण थोड्या वेगाने येताना दिसतो. समोर एक लोखंडी बोर्ड आहे. त्यावर हा तरुण चढतो. बोर्डला धरतो आणि बॅक फ्लिप मारायला जातो. पण त्याच वेळी त्याचा पाय बोर्डला आपटतो आणि त्याचा बॅलेन्स बिघडतो. तो धाडकन जमिनीवर आपटतो. त्याचं डोकं जमिनीवर आपटतं आणि तो तोंडावर आडवा पडतो. त्यानंतर त्याची अवस्था पाहूनच हृदयाची धडधड वाढते. हे वाचा - VIDEO - …अन् जीवाची पर्वा न करता विना कपडे तरुणाने गोठलेल्या तलावात उडी मारली जमिनीवर पडल्यानंतर तरुणाचे डोळे झाकले जातात आणि त्याच्या शरीराची हालचालही होताना दिसत नाही.
parkour_extreme_youtube नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहताच नेटिझन्स शॉक झाले. सर्वांना त्याची चिंता वाटू लागली. कुणी त्यांचं हाड, कुणी मान मोडली असावी अशी शक्यता वर्तवली आहे. काहींनी तर त्याचा जीव तर गेला नाही ना, अशीही भीती व्यक्त केली. सोबतच तो ठिक असावा अशीच प्रार्थना सर्वांनी केली आहे. हे वाचा - अरे बापरे! डान्स करणार तोच…; नवरा-नवरीसोबत घडली भयंकर दुर्घटना; VIDEO VIRAL कमेंटमध्ये मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण ठिक असल्याचं समजतं आहे. पण कृपया तुम्ही असे खतरनाक स्टंट करू नका, असं आवाहन आम्ही तुम्हाला करत आहोत.