मराठी बातम्या /बातम्या /Viral /काय सांगता! संपूर्ण ट्रक वरुन गेला तरीही अंडं सुरक्षित; हे कसं घडलं? पाहा VIDEO

काय सांगता! संपूर्ण ट्रक वरुन गेला तरीही अंडं सुरक्षित; हे कसं घडलं? पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये दिसतं की ट्रकचे टायर अंड्यावरून जातात पण अंड्याला काहीही होत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि ट्रकची चाकं यावरुन जाऊनही अंडं इतकं सुरक्षित कसं राहिलं, असा प्रश्न तुम्हाला पडेल

नवी दिल्ली 24 एप्रिल : अनेकवेळा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कधीकधी हे व्हिडिओ तुम्हाला विचार कऱण्यास भाग पाडतात तर काही व्हिडिओ पाहून आपल्याला डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रकखाली एक अंडं ठेवण्यात आलं आहे. अंड्याला (Egg) थोडा धक्का लागला तरी ते लगेच फुटतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये (Viral Video) जे काही घडतं, ते पाहून तुम्ही अवाक व्हाल.

टॉयलेट सीटमध्ये पडला मोबाईल; बाहेर काढण्यासाठी महिलेनं डोकं आत घातलं पण झाला भलताच उद्योग

व्हिडिओमध्ये दिसतं की ट्रकचे टायर अंड्यावरून जातात पण अंड्याला काहीही होत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि ट्रकची चाकं यावरुन जाऊनही अंडं इतकं सुरक्षित कसं राहिलं, असा प्रश्न तुम्हाला पडेल. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पाहाल.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ट्रकच्या शेवटच्या दोन टायरखाली येऊनही अंडी फुटत नसल्याचं तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला कदाचित कल्पना येईल की जेव्हा टायर अंड्यांवरून जात आहेत, तेव्हा त्याच्यामध्ये असलेल्या रिकाम्या जागेमुळे अंडी फुटलेली नाहीत. ट्रकच्या प्रत्येक बाजूला दोन टायर एकत्र जोडलेले आहेत, ज्यामध्ये थोडं अंतर आहे. अशा स्थितीत त्या अंतराच्या मध्यभागी हे अंडं येत आहे. त्यामुळेच अंड्याला काहीही झालेलं नाही.

OMG! प्रेमाने चक्क घोड्याला KISS करायला गेला चिमुकला; प्राण्याने काय केलं पाहा, VIDEO

कदाचित हा उत्तम टायमिंगचा खेळ असेल किंवा व्हिडिओ अशा प्रकारे बनवला गेला असेल. पण हे पाहून खरोखरच आश्चर्य वाटतं. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर techniiverse नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे, जो नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. याशिवाय हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

First published:

Tags: Stunt video, Video Viral On Social Media