नवी दिल्ली 24 एप्रिल : आजच्या काळात असे बरेच लोक आहेत जे वॉशरूममध्ये आपला मोबाईल वापरतात. मोबाईलचा वापर करत लोक वॉशरूममध्ये आपला वेळ घालवतात. या दरम्यान अनेकवेळा काहीतरी अपघात होतात. अनेकदा मोबाईल वॉशरूममध्ये पडतो. टॉयलेट सीटमध्ये पडलेला महागडा फोन पाहून सहाजिकच कोणालाही दुःख होईल. असाच एक अपघात अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये एका महिलेसोबत घडला आहे. तिचा फोन अचानक टॉयलेट सीटमध्ये पडला (Phone Falls in Toilet Seat). महिलेनं मोबाईल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तिचं डोकंच यात अडकलं (Woman's Head Stuck in Toilet Seat). नंतर अग्निशमन दलाला बोलावून तिचं डोकं बाहेर काढावं लागलं.
असोसिएटेड प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार या महिलेचं नाव समोर आलेलं नाही. मात्र, तिचं वय चाळीशीच्या आसपास असल्याचं सांगण्यात आलं. ही महिला ऑलिम्पिक नॅशनल फॉरेस्टच्या माउंट वॉकरमध्ये असताना तिचा फोन टॉयलेटमध्ये पडला. महिलेनं आधी स्वत:चा फोन काढण्याचा प्रयत्न केला. तिने आपल्या कुत्र्याच्या पट्ट्याच्या सहाय्याने सीटच्या आत पडलेला फोन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. यानंतर सीटच्या आतमध्ये डोकं घालून आणि हात खोलवर नेऊन तिने मोबाईल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिचं डोकं आतमध्ये अडकलं.
टॉयलेट सीटमध्ये डोकं अडकलं तेव्हा ती घरी एकटीच होती. सुमारे दहा ते पंधरा मिनिटं तिने स्वत: डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर कसातरी तिचा मोबाईल हातात आला आणि तिने 911 वर कॉल करून आपल्या आपली ही अवस्था सांगितली. कॉल केल्यानंतर ब्रिनॉन अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत महिलेला मदत केली. महिलेचं डोके काढता यावं म्हणून त्यांनी टॉयलेट सीटमध्ये स्पेस बनवली.
गर्लफ्रेंडने दिलं अतिशय विचित्र गिफ्ट; पाहताच सरकली तरुणाच्या पायाखालची जमीन
अग्निशमन विभागाने बचाव केल्यानंतर महिलेला तातडीने अंघोळ घालण्यात आली. महिलेला एक टीवेक सूट घातला गेला, जो सामान्यतः फॉरेन्सिक टीम्स गुन्ह्याच्या ठिकाणी परिधान करतात. महिलेनं सुखरूप सुटकेनंतर सांगितलं की, तिला दुखापत झाली नाही आणि तिला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत लागली नाही. तिला वाचवण्यासाठी इतक्या लवकर आल्याबद्दल तिने आपत्कालीन टीमचे आभार मानले आणि नंतर कॅलिफोर्नियाला परत गेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mobile Phone, Viral news