व्हिडिओमध्ये (Horse Video) दोघंही अगदी जवळ उभा असल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान, निरागस मुलगा आपला चेहरा घोड्याच्या जवळ घेऊन जातो. यानंतर तो घोड्याचं अत्यंत प्रेमानं चुंबन घेताना दिसतो. लहान मुलगा घोड्याला मिठी मारताना दिसत आहे. दुसरीकडे, घोड्यानेही मुलाच्या या प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद दिला. व्हिडिओमध्ये दिसतं की मुलाने चुंबन घेतल्यानंतर घोडा देखील त्याच्या डोक्यावर प्रेमाने चुंबन घेतो. 23 लाख रूपये देऊन खरेदी केला घोडा; घरी आणताच सत्य जाणून हादरला व्यक्ती हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की, आतापर्यंत या व्हिडिओला 1.5 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ट्विटरवर @buitengebieden_ नावाच्या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लोक पुन्हा पुन्हा बघत आहेत. घोडा ज्या प्रकारे मुलावर प्रेमाचा वर्षाव करतो, ते दृश्य अतिशय मनमोहक आहे, असं नेटकरी म्हणत आहेत.Twitter needs this.. 😊 pic.twitter.com/nkgbUblHst
— Buitengebieden (@buitengebieden_) April 22, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pet animal, Video viral