मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - मुलाच्या शाळेत गोळीबाराचं LIVE Reporting करत होती आई; लेकाबाबतच असं काही समजलं की...

VIDEO - मुलाच्या शाळेत गोळीबाराचं LIVE Reporting करत होती आई; लेकाबाबतच असं काही समजलं की...

एक रिपोर्टर आई आपल्या मुलाच्या शाळेतील गोळीबाराचं लाईव्ह रिपोर्टिंग करत होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

एक रिपोर्टर आई आपल्या मुलाच्या शाळेतील गोळीबाराचं लाईव्ह रिपोर्टिंग करत होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

एक रिपोर्टर आई आपल्या मुलाच्या शाळेतील गोळीबाराचं लाईव्ह रिपोर्टिंग करत होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

वॉशिंग्टन, 25 मार्च : आई ही आईच असते. कुणीही कितीही प्रयत्न केलं, काहीही केलं तरी आईचं प्रेम, आईची माया देऊच शकत नाही. म्हणूनच आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, असं म्हणतात ते अगदी बरोबर आहे. अशाच एका आईचा व्हिडीओ सध्या सोशल मी़डियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात एक आई आपल्या मुलाच्या शाळेतील गोळीबाराचं लाईव्ह रिपोर्टिंग करत होती. त्याचवेळी तिला तिच्या मुलाबाबत असं काही समजलं की ती स्वतःला रोखू शकली नाही.

अमेरिकेच्या डेनवरमध्ये बुधवारी का शाळेत गोळीबार झाल्याची घटना घडली. एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने एका मुलावर गोळ्या झाडल्या. यामध्ये शाळेतील दोन कर्मचारीही जखमी झाले आहेत. ऑस्टिन लिली असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. शाळेत विद्यार्थ्याकडे बंदूक असल्याची माहिती शाळा प्रशासनाला मिळाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बॅगेची तपासणी केली जात होती. ऑस्टिनच्या बॅगेत बंदूक सापडताच तिने त्याच बंदुकीने हल्ला केला आणि ती पळून गेली. तिचा शोध सुरू आहे. याचदरम्यान एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

लेकाच्या DNA टेस्टमुळे उलगडलं आईचं असं सिक्रेट; मुलासह संपूर्ण कुटुंब हादरलं

या शाळेत शिकत असलेला एक मुलगा ज्याची आई एलिसिया एक्युना रिपोर्टर आहे. जेव्हा शाळेत गोळीबार झाला तेव्हा तिचा मुलगा शाळेतच होता. गोळीबार झाल्यानंतर तो आपला जीव वाचवण्यासाठी लपला आणि त्याने लगेच आईला मेसेज केला. त्याने तात्काळ आपल्या आईला मेसेज करून याची माहिती दिली. एलिसिया तेव्हा दुसऱ्या बातमीचं रिपोर्टिंग करत होती. तिने ते रिपोर्टिंग थांबवलं आणि ती लगेच मुलाच्या शाळेजवळ पोहोचली. मुलाची चिंता तिला होतीच पण तरी काळजावर दगड ठेवून तिने तिथंच लाइव्ह रिपोर्टिंग सुरू केलं.

याचवेळी शाळेच्या आत असलेला तिचा मुलगा अचानक बाहेर आला. त्याला पाहताच ती भावुक झाली. तो सुरक्षित असल्याचं पाहून तिला आनंद झाला आणि तिने लाईव्ह टीव्हीवरच आपल्या मुलाला मिठी मारली.  तिचा चेहरा पाहून, आवाज ऐकूनच ती किती चिंतेत होती, हे दिसतं. मुलगा सुखरूप असल्याची खात्री पटल्यानंतर तिला हायसं वाटलं.

Shocking! 3 वर्षांचा लेक तडफडत होता तरी आई VIDEO बनवत राहिली, चिमुकल्याचा गेला जीव

कामाच्या वेळी ती पर्सनल रिलेशनही जपत होती, त्यामुळे तिने अँकर आणि प्रेक्षकांची माफी मागितली. मला माफ करा, मला माफ करा. तुमचं मूल तुमच्या समोरून जातं आहे आणि तुम्ही फक्त त्याच्याकडे पाहाल, असं होऊ शकत नाही ना. असं ती म्हणाली.

" isDesktop="true" id="855526" >

अँकरने तिच्या भावना समजून घेत तिला काही वेळ रिपोर्टिंग थांबवून आपल्या मुलासोबत वेळ घालवण्यास सांगितलं. पण एलिसियाने असं बिलकुल केलं नाही. तिने मुलाला आलिंगन दिलं, तो तिथून गेला आणि तिने लगेच पुन्हा रिपोर्टिंग सुरू केलं.

First published:
top videos

    Tags: Gun firing, Mother, Parents and child, School, Son, Student, Viral, Viral videos, World news