मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking! 3 वर्षांचा लेक तडफडत होता तरी आई VIDEO बनवत राहिली, चिमुकल्याचा गेला जीव

Shocking! 3 वर्षांचा लेक तडफडत होता तरी आई VIDEO बनवत राहिली, चिमुकल्याचा गेला जीव

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

आईने मुलासोबत जे केलं ते वाचूनच तुमच्या तळपायातील आग मस्तकात जाईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

लंडन, 17 मार्च : मुलांना साधं खरचटलं तरी आईच्या काळजाचं पाणी पाणी होतं. त्यांना दुखलं-खुपलं, लागलं तर त्याचे घाव आईच्या हृदयावर होतात. त्या जखमांच्या वेदना मुलांपेक्षा तिला जास्त होतात. आई ही अशीच असते. पण एक महिला आईच्या नावाला कलंक बनली. चिमुकला लेक तिच्यासमोर तडफडत होता तरी ती व्हिडीओ बनवत राहिली. अखेर चिमुकल्याचा जीव गेला आहे.

यूकेतील ही संतापजनक घटना आहे. आईने मुलासोबत जे केलं ते वाचूनच तुमच्या तळपायातील आग मस्तकात जाईल.  हार्वे बोरिंग्टन असं या चिमुकल्याचं नाव आहे. तो आपली आई लीली बोरिंग्टनसोबत राहत होता. एक दिवस तो खुर्चीवरून पडला, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो तडफडत होता. त्यावेळी आईने त्याला वाचवण्यासाठी धडपड करणं अपेक्षित होतं. एमर्जन्सी नंबरवर कॉल करायला हवा होता, अॅम्ब्युलन्स बोलवायला हवी होती, मुलाला घेऊन रुग्णालयात जायला हवं होतं. पण लीली मात्र तडफडत असलेल्या मुलाचा व्हिडीओ बनवता राहिली.

आई गं! आईची साडीच लेकीसाठी बनली काळ; 12 वर्षीय मुलीचा तडफडून गेला जीव

लीलीने सांगितलं, हार्वे खुर्चीवरून पडला होता. त्याला बोलता येत नव्हतं त्यामुळे एमर्जन्सी कॉल लावण्यासाठी पॅरामेडिक्सला त्याची अवस्था दाखवण्यासाठी व्हिडीओ बनवला होता.पण हार्वेच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. त्याच्या मेंदूत खूप रक्तस्राव झाला होता. तपासणीत त्याच्या डोक्याला आणि हाताला फ्रॅक्चर झाल्याचं समजलं. मेडिकल एक्सपर्टच्या मते, खुर्चीवरून पडल्यामुळे अशी दुखापत होऊ शकत नाही. मग ते लहान मूल का असेना. मुलाला वारंवार डोक्यावर जोरात आपटण्यात आलं आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. लीलीने एमर्जन्सी नंबरवर फोन करण्याऐवजी हार्वेच्या वडिलांना मेसेज करून हे माझ्यासोबतच हा होतं, असं विचारल्याचंही तपासात समोर आलं.

हार्वे आरोग्य कर्मचाऱ्यांना बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचार मिळाले तोपर्यंत खूप उशीर झाला.  घटनेच्या दोन दिवसांनीच त्याचा मृत्यू झाला.

2 वर्षीय चिमुकल्याने आधी विषारी सापाला पळव पळव पळवलं, नंतर...; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

लीली ही हार्वेची सावत्र आई होती.  हार्वेची खरी आई कॅटी होलरॉईडने कोर्टात सुनावणीवेळी लीलीने आपल्या मुलाला क्रूरपणे मारल्याचा आरोप केला. ती म्हणाली, माझ्या मुलाला बोलता येत नव्हतं, त्याला किती वेदना झाल्या असतील.

दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने लीलीला दोषी ठरवलं. तिला 15 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार काळीज पिळवटून टाकणारी ही घटना 2 वर्षांपूर्वी 7 ऑगस्ट 2021 रोजी ही घटना घडली.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Mother, Murder, Parents, Parents and child, Small child, Son, Uk, Viral, Viral news, World news