सिंग्नल तोडून हवेत उडाली गाडी, तीन वेळा आपटून रस्त्यावर आदळली; पाहा भंयकर अपघाताचा VIDEO

सिंग्नल तोडून हवेत उडाली गाडी, तीन वेळा आपटून रस्त्यावर आदळली; पाहा भंयकर अपघाताचा VIDEO

या व्हिडीओमध्ये दुसऱ्या बाजूनं येणारी गाडीला जोरदार धडक दिली. ही टक्कर एवढी जबरदस्त होती की दुसऱ्या बाजूनं येणारी गाडी हवेत उडून खाली आदळली.

  • Share this:

डर्बन, 01 ऑक्टोबर : कसा आणि कुठे मृत्यू येईल हे कोणालाच माहित नसते. असाच प्रकार डर्बनमध्ये घडला. एका भयंकर अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दुसऱ्या बाजूनं येणारी गाडीला जोरदार धडक दिली. ही टक्कर एवढी जबरदस्त होती की दुसऱ्या बाजूनं येणारी गाडी हवेत उडून खाली आदळली. या अपघातामुळे गाडीचा चुराडा झाला.

न्यूज24 नं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात झाला तेव्हा सिग्नल होता. मात्र समोरून येणारी गाडी सिग्नल तोडून पुढे आली, त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामुळे रेंज रोव्हर हवेत उडाली, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं या भयंकार अपघाताचा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात तयार केला.

वाचा-आईचा हात सोडून रस्ता क्रॉस करताना समोरून आला ट्रक आणि...

वाचा-VIDEO : पतीच्या त्रासामुळे सोडलं घर, 2 वर्षांनंतर समुद्रात तरंगताना दिसली महिला

अपघात झालेली रेंज रोव्हर गाडी हवेत उडून रस्त्यावर जोरात आदळली, त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर रेंज रोव्हरमध्ये असलेल्या तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताचा भयंकर व्हिडीओ 24 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला आहे.

वाचा-पोलिसांच्या मुलांनीच तोडला नियम, व्हायरल झाला विनामास्क क्रिकेट खेळतानाचा VIDEO

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये हा अपघात कसा घडला, याचे फुटेज पाहून कारवाई केली जाणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 1, 2020, 2:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या