ब्रुकलिन, 01 ऑक्टोबर : न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन हे शहर सर्वात गजबजलेल्या शहरांपैकी एक मानले जाते. मात्र घटनेमुळे हे संपूर्ण शहर सुन्नं झालं आहे. एका सात वर्षांच्या मुलीचा इथं रस्ता क्रास करताना अपघात झाला. हा घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
7 वर्षी समा अली पार्कमधून आपल्या घरी जात असताना तिच्यासोबत आई, बहिण आणि काही मित्र-मैत्रिणी होत्या. रस्ता क्रास करताना आईचा हात सुटला आणि समा मागे राहिली, मात्र मागून येणाऱ्या ट्रकला रस्त्यावर मुलगी असल्याचे दिसले नाही आणि तिला धडक दिली. या अपघातात सात वर्षीय समाचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये तिची आई रस्त्यावरच मुलीकडे एकटक बघून रडतानाही दिसत आहे.
वाचा-VIDEO : पतीच्या त्रासामुळे सोडलं घर, 2 वर्षांनंतर समुद्रात तरंगताना दिसली महिला
वाचा-पोलिसांच्या मुलांनीच तोडला नियम, व्हायरल झाला विनामास्क क्रिकेट खेळतानाचा VIDEO
भीषण अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने लगेचच समाला मदत करत रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहचण्याआधीच तिचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये ट्रक चालकाने, गाडीसमोर मुलगी वाकून काहीतरी उचलत असावी, त्यामुळे ती मला दिसली नाही असे सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर ट्रक चालकानं पळून न जाता मुलीच्या कुटुंबियांना मदत केली.
वाचा-वाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO
न्यूयॉर्क पोलिसांनी या घातपात नसून अपघात असल्याचे सांगितले आहे. तसेच ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र अद्याप अली कुटुंबियांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv