Home /News /viral /

पतीच्या त्रासामुळे सोडलं घर, 2 वर्षांनंतर समुद्रात तरंगताना दिसली महिला; पाहा VIDEO

पतीच्या त्रासामुळे सोडलं घर, 2 वर्षांनंतर समुद्रात तरंगताना दिसली महिला; पाहा VIDEO

पाण्यात तरंगत असताना महिलेने हात उंचावला व त्यावेळी तेथे मासेमाऱ्यांची एक बोट होती

    कोलंबिया, 30 सप्टेंबर : दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली कोलंबियातील एक महिला (Colombian Woman) शनिवार समुद्रात जिवंत (Woman Found Alive At Sea) सापडली. द सनने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा मासेमाऱ्यांनी एन्जलिका गॅटनला पाण्यात तरंगताना पाहिलं तर ते घाबरले. त्यांनी महिलेला वाचवलं व तिला किनाऱ्यापर्यंत आणून सोडलं. सोशल मीडियावर (Social Media) हा रेस्क्यू व्हिडीओ जलद गतीने व्हायरल (Viral Video) होत आहे. महिलेला 46 वर्षीय मासेमार रोलँडो विसबल आणि त्याच्याने वाचवलं. ही महिला शनिवारी सकाळी साधारण 6 वाजता प्यूटो कोलम्बियाच्या किनाऱ्यावरुन साधारण 2 किलोमीटर अंतरावर सापडली. विसबलने फेसबुकवर शेअर केलेला व्हिडीओ त्याच्या मित्राने महिलेला रेस्क्यू करताना केला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार सुरुवातीला मासेमाऱ्याला तो लाकडाचा तुकडा असल्याचे वाटले. जेव्हा महिलेने हात वर करीत मदत मागितली तेव्हा एक महिला समुद्रात तरंगत असल्याचे दिसून आले. या व्हिडीओमध्ये विसबल आणि त्याचा मित्र एन्जलिना हिला बोटीत खेचत असताना दिसत आहे.  वाचवल्यानंतर महिला म्हणाली, माझा पुनर्जन्म झाला आहे. मी मरू नये अशी देवाची इच्छा आहे. एन्जलिकाची ओळख पटल्यानंतर तिने आरसीएन रेडिओच्या मागील सर्व सत्य सांगितलं. तिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला होता आणि म्हणून 2018 मध्ये तिने पळून जाण्याचा निर्णय घेतला. एन्जलिका पुढे म्हणाली की, 20 वर्षांपर्यंत मी नात्यात त्रस्त झाले होते. पहिली गर्भधारणा झाल्यानंतर पतीकडून शोषण सुरू झालं. तो मारहाण करीत होता, असेही एन्जलिकाने सांगितले. यावेळी पोलिसांनीही तिची मदत केली नसल्याचं तिचं म्हणणं आहे. हे ही वाचा-पोलीस अधिकाऱ्याने आधी प्रेयसीवर झाडली गोळी, नंतर सासऱ्याची केली हत्या 24 तास तुरुंगात ठेवल्यानंतर पतीला सोडून देण्यात आलं. त्यानंतर पुन्हा तिच्यावर हिंसाचार केला जात होता. ती पुढए म्हणाली, 2018 च्या सप्टेंबर महिन्यात पतीने तिच्या चेहऱ्यावर जोरदार वार केलं व तिला मारण्याचा प्रयत्न केला. हे असह्य झाल्याने तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. पहिले सहा महिने ती रस्त्यांवर राहायला जागा शोधण्यासाठी भटकत होती. त्यानंतर मला आत्महत्या करावीशी वाटत होती. अशा परिस्थितीत कोणीच माझी मदत केली आहे. त्यानंतर मासेमाऱ्यांनी ती पाण्यात तरंगत असताना दिसली.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Wife and husband

    पुढील बातम्या